2.6 KiB
2.6 KiB
अमस्या
तथ्य:
ज्यावेळी अमस्याच्या वडिलांना योवाश राजाला मारण्यात आले त्या नंतर अमस्या यहुदा राज्याचा राजा झाला.
- अमस्या राजाने यहुदावर एकोणतीस वर्षे राज्य केले, इ.स. पूर्व 796 पासून ते इ.स.पूर्व 767 पर्यंत.
- तो एक चांगला राजा होता परंतु जेथे मूर्तींची पूजा केली जाते त्या उच्चस्थानांचा त्याने नाश केला नाही.
- अमस्याने शेवटी आपल्या वडिलांच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या सर्व माणसांना जिवे मारले.
- त्याने बंडखोर अदोमी लोकांचा पराभव केला आणि यहूदा राज्याच्या ताब्यात त्यांना परत आणले.
- त्याने इस्राएलातील राजा योवाशला एका युद्धात आव्हान दिले, परंतु हरला गेला. यरुशलेमच्या तटबंदीचा काही भाग तुटला होता आणि मंदिरातील चांदीची सोन्याची भांडी चोरीला गेली होती.
- काही काळानंतर अमस्या राजा यहोवापासून वळला आणि यरुशलेममधील काही ठराविक माणसांनी एकत्र येऊन कट रचुन त्याची हत्या केली.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा
पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
-
Strong's: H558