mr_tw/bible/kt/zealous.md

3.0 KiB

उत्साह, उत्साही

व्याख्या:

"उत्साह" आणि "उत्साही" हे शब्द व्यक्तीला किंवा कल्पनेला पाठिंबा देण्यासाठी अति वाहवून घेणे याला संदर्भित करते.

  • उत्साहामध्ये तीव्र इच्छा आणि चांगले करण्याच्या क्रियांचा समावेश आहे. हे सहसा अशा व्यक्तीचे वर्णन करण्यासाठी वापरले जाते जे विश्वासूपणे देवाचे पालन करतात आणि इतरांना ते करण्यास शिकवतात.
  • उत्साही असणे म्हणजे काहीतरी करण्याचा तीव्र प्रयत्न करणे आणि त्या प्रयत्नात टिकून राहणे.
  • "परमेश्वराचा उत्साह" किंवा "याहवेचा उत्साह" म्हणजे आपल्या लोकांना आशीर्वाद देण्यासाठी किंवा न्याय मिळावा यासाठी देवाच्या दृढ, चिकाटीने केलेल्या कृतीला संदर्भित करते.

भाषांतरातील सूचना:

  • "उत्साही" या शब्दाचे भाषांतर "खुप चिकाटी असणे" किंवा "तीव्र प्रयत्न करणे" असे केले जाऊ शकते.
  • "उत्साह"या शब्दाचे भाषांतर "उन्माद भक्ती" किंवा "तीव्र दृढनिश्चय" किंवा "धार्मिक आवेश" असे देखील केले जाऊ शकते

"आपल्या घरासाठी उत्साह" या वाक्यांशाचे भाषांतर, "आपल्या मंदिराचा खुप सन्मान करणे" किंवा "आपल्या घराची काळजी घेण्याची तीव्र इच्छा"

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

  • [1 करिंथकरांस पत्र 12:31]
  • [1 राजे 19: 9-10]
  • [प्रेषितांचे कृत्ये 22:03]
  • [गलतीकरांस पत्र 04:17]
  • [यशया 15 63:१:15]
  • [योहान 02: 17-19]
  • [फिलिप्पैकरांस पत्र 03:06]
  • [रोमकरांस पत्र 10: 1-3]

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: एच 7065, एच 7068, जी 2205, जी 2206, जी 2207, जी 6041