mr_tw/bible/kt/world.md

5.2 KiB

जग, जगीक

व्याख्या:

"जग" हा शब्द सामान्यत: विश्वाच्या त्या भागाचा संदर्भ देतो जिथे लोक राहतात: पृथ्वी. "जगीक" या शब्दामध्ये या जगात राहणाऱ्या लोकांच्या वाईट मूल्ये आणि वर्तनांचे वर्णन केले आहे.

  • त्याच्या सर्वसाधारण अर्थाने, "जग" हा शब्द स्वर्ग आणि पृथ्वी आणि त्यातील प्रत्येक गोष्टीचा संदर्भ देतो.
  • बऱ्याच संदर्भांमध्ये, "जग" म्हणजे "जगातील लोक."
  • कधीकधी असे सूचित केले जाते की याचा अर्थ पृथ्वीवरील वाईट लोक किंवा जे लोक देवाचे आज्ञा पालन करीत नाहीत त्यांना संदर्भित करते.
  • या जगात राहणाऱ्या लोकांची स्वार्थी वागणूक आणि भ्रष्ट मूल्यांचा संदर्भ घेण्यासाठी प्रेषितांनी "जग" हा शब्द देखील वापरला आहे. यात मानवी प्रयत्नांवर आधारित स्व-नीतिमान धार्मिक पद्धतींचा समावेश असू शकतो.
  • लोक आणि गोष्टींचे या मूल्याद्वारे व्यक्तिचित्रण केले जाते ज्यांना "जगिक" असे म्हटले जाते.

भाषांतरातील सूचना:

  • संदर्भानुसार, "जग" या शब्दाचेच भाषांतर "विश्व" किंवा "या जगाचे लोक" किंवा "जगातील भ्रष्ट गोष्टी" किंवा "जगातील लोकांच्या वाईट वृत्ती" असे म्हणून केले जाऊ शकते
  • "सर्व जग" या वाक्यांशाचा अर्थ बऱ्याचदा "बरेच लोक" असा होतो आणि विशिष्ट प्रदेशात राहणाऱ्या लोकांना ते संदर्भित करते. उदाहरणार्थ, "सर्व जग मिसरास आले" असे भाषांतर "आजूबाजूच्या देशातील बरेच लोक मिसरास आले होते" किंवा "मिसरच्या आसपासच्या सर्व देशांतील लोक तिथे आले" असे केले जाऊ शकते.
  • "सर्व जग त्यांच्या गावी रोमी जनगणनेत नोंदणी करण्यासाठी आले" हे भाषांतर करण्याचा आणखी एक मार्ग "रोमन साम्राज्याच्या शासित प्रदेशात राहणारे बरेच लोक गेले" हा असेल.
  • संदर्भानुसार, "जगिक" या शब्दाचे भाषांतर "वाईट" किंवा "पापमय" किंवा "स्वार्थी" किंवा "अधार्मिक" किंवा "भ्रष्ट" किंवा "या जगातील लोकांच्या भ्रष्ट मूल्यांमुळे प्रभावित" असे म्हणून केले जाऊ शकते

"जगातील या गोष्टी सांगणे" या वाक्यांशाचे भाषांतर "जगातील लोकांना या गोष्टी सांगणे" असे म्हणून केले जाऊ शकते.

  • इतर संदर्भांमध्ये, "जगिक" या शब्दाचे भाषांतर "जगातील लोकांमध्ये राहणे" किंवा "अधार्मिक लोकांमध्ये राहणे" असे म्हणून देखील केले जाऊ शकते.

(हे देखील पाहा: [भ्रष्ट], [स्वर्ग], [रोम], [अधार्मिक])

पवित्र शास्त्रतील संदर्भ:

  • [1 योहान 02:15]
  • [1 योहान 04:05]
  • [1 योहान 05:05]
  • [योहान 01:29]
  • [मत्तय 13:36-39]

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: एच 776, एच 2309, एच 2465, एच 5769, एच 8398, जी 1093, जी 2886, जी 2889, जी 3625