mr_tw/bible/kt/works.md

4.6 KiB

काम, कामे, कृत्ये

व्याख्या:

"कार्य" हा शब्द सामान्यत: एकतर काहीतरी साध्य करण्यासाठी खर्च करण्याच्या प्रयत्नास किंवा त्या क्रियेच्या परिणामास सूचित करतो. "कामे" हा शब्द सामान्यत: संपूर्ण क्रियांना सूचित करतो (म्हणजेच ज्या गोष्टी केल्या किंवा केल्या पाहिजेत).

  • पवित्र शास्त्रात हे शब्द सामान्यत: देव आणि मानवाच्या संदर्भात वापरले जातात.
  • जेव्हा देवाच्या संदर्भात वापरली जाते, तेव्हा पवित्र शास्त्रीतील "कार्य" ही संज्ञा बहुतेक वेळा विश्व निर्माण करण्याच्या किंवा आपल्या लोकांना (एकतर शत्रूंकडून, पापापासून किंवा दोन्हीपासून) वाचविण्याच्या देवाच्या कृतीचा संदर्भ देते.
  • देवाची कामे तो करत असलेल्या किंवा केलेल्या सर्व गोष्टींचा संदर्भ घेतात, ज्यात जग निर्माण करणे, पाप्यांना वाचविणे, सर्व सृष्टीच्या गरजा भागविणे आणि संपूर्ण विश्व जागृत ठेवणे यांचा समावेश आहे.
  • एखादी व्यक्तीने केलेली कामे किंवा कृती एकतर चांगली किंवा वाईट असू शकते.

भाषांतरातील सूचना:

  • "कामे" या संज्ञेचे भाषांतर करण्याचे इतर मार्ग "कृत्ये" किंवा "कृती" किंवा "पूर्ण केलेल्या गोष्टी"
  • देवाचे "कामे" किंवा "कृत्ये" किंवा "त्याच्या हातांचे कार्य" यांचे भाषांतर "चमत्कार" किंवा "अद्भुत कृत्ये" किंवा "देव करतो त्या गोष्टी" असे म्हणून केले जाऊ शकते

"देवाचे कार्य" या अभिव्यक्तीचे भाषांतर "देव करीत असलेल्या गोष्टी" किंवा "देव करीत असलेले चमत्कार" किंवा "देवाने जे केले आहे ते सर्व" असे म्हणून केले जाऊ शकते

  • "कार्य" हा शब्द “कार्ये” या शब्दाचे एकवचनी रुप असु शकते जसे "प्रत्येक चांगले कार्य" किंवा "प्रत्येक चांगली कृती".
  • जेव्हा देव किंवा इतरांसाठी काम केले जाते तेव्हा त्याचे भाषांतर "सेवा" किंवा "सेवाकार्य" असे म्हणून केले जाऊ शकते

(हे देखील पाहा: [फळ], [पवित्र आत्मा], [चमत्कार])

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

  • [1 योहान 03:12]
  • [प्रेषितांचे कृत्ये 02: 8-11]
  • [दानिएल 04:37]
  • [निर्गम 34: 10-11]
  • [गलतीकरांस पत्र 02: 15-16]
  • [याकोब 02:17]
  • [मत्तय 16: 27-28]
  • [मीखा 02:07]
  • [रोमकरांस पत्र 03:28]
  • [तीताला पत्र 03: 4-5]

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: एच 4399, एच 4566, एच 4567, एच 4611, एच 4659, एच 5949, जी 2041