mr_tw/bible/kt/transgression.md

3.3 KiB

उल्लंघन करणे, अपराध, पाप

व्याख्या:

"उल्लंघन करणे" या शब्दाचा संदर्भ आज्ञा, नियम, किंवा नैतिक संग्रह मोडण्याशी येतो. "उल्लंघन करणे" म्हणजे "पाप करणे" होय.

  • लाक्षणिक अर्थाने, "उल्लंघन करणे" ह्याचे वर्णन "सीमारेषेचे उल्लंघन करणे" म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या चांगल्यासाठी ठेवण्यात आलेल्या सीमारेषा किंवा मर्यादांच्या पुढे जाणे.
  • "उल्लंघन करणे," "पाप," "वाईट गोष्टी," आणि "अतिक्रमण" या सर्वांच्या अर्थामध्ये, देवाच्या विरुद्धमध्ये कार्य करणे आणि त्याच्या आज्ञा मोडणे ह्यांचा समावेश होतो.

भाषांतर सूचना:

  • "उल्लंघन" या शब्दाचे भाषांतर "पाप" किंवा "अवज्ञा करणे" किंवा "बंडखोर" असेही केले जाऊ शकते.
  • जर, एखाद्या वाचनात किंवा परिच्छेदात "पाप" किंवा "उल्लंघन" किंवा "अतिक्रमण" या अर्थाच्या दोन शब्दांचा उपयोग होत असेल तर, शक्य असल्यास, या शब्दांचे भाषांतर करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करावा. जेंव्हा पवित्र शास्त्र दोन किंवा अधिक एकसारख्या अर्थाच्या शब्दांचा उपयोग एकाच संदर्भामध्ये केला जातो, तेंव्हा सहसा त्याचा हेतू जे सांगितले जाते किंवा दाखवले जाते, त्यावर भर देण्याचा असतो.

(पहा: समांतरता)

(हे सुद्धा पहा: पाप, अतिक्रमण, वाईट गोष्टी)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: