mr_tw/bible/kt/soul.md

3.8 KiB

आत्मा, स्वत:

व्याख्या:

"आत्मा" हा शब्द एकतर सामान्यत: एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक-नसलेल्या भागाचा संदर्भ घेऊ शकतो किंवा एखाद्या व्यक्तीची स्वतःबद्दलची जागरूकता इतरांपेक्षा वेगळी व्यक्ती म्हणून उल्लेख करू शकतो.

  • पवित्र शास्त्रात "जीव" आणि "आत्मा" हे शब्द दोन भिन्न संकल्पना असू शकतात किंवा त्या दोन संज्ञा समान संकल्पनेला संदर्भित असु शकतात.
  • जेव्हा एखादा व्यक्ती मरण पावतो तेव्हा त्याचा आत्मा आपले शरीर सोडतो.
  • शरीराच्या विरुध्द, "आत्मा” एखाद्या व्यक्तीचा भाग म्हणून बोलला जाऊ शकतो जो "देवाशी संबंधित आहे."
  • कधीकधी संपूर्ण व्यक्तीचा संदर्भ घेण्यासाठी "आत्मा" हा शब्द लाक्षणिकरित्या वापरला जातो. उदाहरणार्थ, "जो पाप करतो तो आत्मा” म्हणजे "ज्याने पाप केले तो व्यक्ती" आणि "माझा आत्मा थकलेला आहे" म्हणजे "मी थकलो आहे."

भाषांतरातील सूचना:

  • "आत्मा” या शब्दाचे भाषांतर "आतील स्व" किंवा” आतील व्यक्ती" असे देखील केले जाऊ शकते
  • काही संदर्भांमध्ये, "माझा आत्मा” या वाक्यांशाचे भाषांतर "मी" किंवा” मी" असे केले जाऊ शकते
  • सहसा संदर्भानुसार "आत्मा” या वाक्यांशाचे भाषांतर "व्यक्ती" किंवा "तो" किंवा” त्याला" असे केले जाऊ शकते.
  • काही भाषांमध्ये "जीव" आणि "आत्मा" या संकल्पनेसाठी फक्त एक शब्द असू शकतो
  • इब्री 4:12 मध्ये, "जीव आणि आत्मा विभागणे" या अलंकारिक वाक्यांशाचा अर्थ "सखोल समजून घेणे किंवा आतील व्यक्तीला उघडकीस आणणे" असे असू शकतो

(हे देखील पाहा: [आत्मा])

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

  • [2 पेत्र 02:08]
  • [प्रेषितांचे कृत्ये 02: 27-28]
  • [प्रेषितांचे कृत्ये 02:41]
  • [उत्पत्ति 49:06]
  • [यशया 53:10-11]
  • [याकोबाचे पत्र 01:21]
  • [यिर्मया 06: 16-19]
  • [योना 02: 7-8]
  • [लुक 01:47]
  • [मत्तय 22:37]
  • [स्तोत्रसंहीता 019:07]
  • [प्रकटीकरण 20: 4]

शब्द संख्या:

  • स्ट्रॉग्नचे: एच 5082, एच 5315, एच 5397, जी 5590