mr_tw/bible/kt/sonsofgod.md

4.6 KiB

देवपुत्र (देवाचे मुलगे)

व्याख्या:

"देवपुत्र" हा शब्द एक लाक्षणिक अभिव्यक्ती आहे, ज्याचे अनेक संभाव्य अर्थ आहेत.

  • नवीन करारामध्ये, "देवपुत्र" या शब्दाचा उल्लेख येशुमधील सर्व विश्वासणाऱ्यांसाठी केला आहे, आणि सहसा ह्याचे भाषांतर "देवाची मुले" असे केले जाते, कारण त्यात पुरुष आणि स्त्रिया दोघांचाही समावेश होतो.
  • या शब्दाचा उपयोग देवाशी असणाऱ्या नातेसंबंधाबद्दल सांगतो, जे मानवी पुत्र आणि त्याच्या पित्याच्या नातेसंबंधासारखे आहे, आणि ज्यात पुत्र असण्याचे सर्व विशेषाधिकार त्याच्याशी संलग्न आहेत.
  • काही लोक उत्पत्ति 6 मध्ये प्रकट झालेल्या "देवपुत्र" या शब्दाचा उल्लेख करतात आणि त्याचा अर्थ खाली पाडलेले देवदूत—दुष्ट आत्मे किंवा दुरात्मे असा लावतात. इतर काहींना असे वाटते की ते शक्तिशाली राजकीय शासक किंवा शेथच्या वंशजांना सूचित करतात.
  • नवीन करारामध्ये, "देवपुत्र" या शब्दाचा उल्लेख येशुमधील सर्व विश्वासणाऱ्यांसाठी केला आहे, आणि सहसा ह्याचे भाषांतर "देवाची मुले" असे केले जाते, कारण त्यात पुरुष आणि स्त्रिया दोघांचाही समावेश होतो.
  • या शब्दाचा उपयोग देवाशी असणाऱ्या नातेसंबंधाबद्दल सांगतो, जे मानवी पुत्र आणि त्यांच्या पित्याच्या नातेसंबंधासारखे आहे, आणि ज्यात पुत्र असण्याचे सर्व विशेषाधिकार त्याच्याशी संलग्न आहेत.
  • "देवाचा पुत्र" हे शीर्षक एक वेगळी संज्ञा आहे: ज्याचा संदर्भ येशुशी आहे, जो देवाचा एकुलता एक पुत्र आहे.

भाषांतर सूचना

  • जेंव्हा "देवपुत्र" ह्याचा संदर्भ येशुंमधील विश्वासणाऱ्यांशी येतो, तेंव्हा त्याचे भाषांतर "देवाची मुले" असे केले जाऊ शकते.
  • उत्पत्तीच्या 6:2 व 4 मध्ये "देवाचे पुत्र" ह्याचे भाषांतर करण्याच्या मार्गामध्ये "देवदूत", "आत्मिक अस्तित्व," "अलौकिक जीव," किंवा "दुरात्मे" ह्यांचा समावेश होतो.
  • तसेच "पुत्र" साठी असलेला मुद्दा पहा.

(हे सुद्धा पहा: देवदूत, दुरात्मा, पुत्र, देवाचा पुत्र, शासक, आत्मा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: