mr_tw/bible/kt/sonofman.md

4.6 KiB

मनुष्याचा पुत्र, मानवपुत्र

व्याख्या:

"मनुष्याचा पुत्र" हे शीर्षक येशूने स्वतःला संदर्भित करण्यासाठी वापरले होते. "मी" किंवा "मला" असे म्हणण्याच्या ऐवजी त्याने सहसा या शब्दाचा उपयोग केला.

  • पवित्र शास्त्रामध्ये, "मनुष्याचा पुत्र" हा एखाद्या मनुष्याचा संदर्भ देण्याचा किंवा त्याला उद्देशण्याचा एक मार्ग असू शकतो. ह्याचा अर्र्थ "मनुष्य" असा देखील होतो.
  • यहेज्केलच्या जुन्या करारातील पुस्तकामध्ये, देवाने वारंवार यहेज्केलला "मनुष्याचा पुत्र" असे संबोधले आहे. उदाहरणार्थ तो म्हणाला, "तू, मानवपुत्रा, भविष्यवाणी कर"
  • दानीएल संदेष्ट्याने "मनुष्याच्या पुत्राला" मेघांसाहित येतानाचा दृष्टांत पहिला, ज्याचा संदर्भ येणाऱ्या मासिहाशी होता.
  • येशू सुद्धा बोलला की, एके दिवशी मनुष्याचा पुत्र मेघारूढ होऊन परत येईल.
  • मनुष्याच्या पुत्राचे ढगांवर येण्याचे संदर्भ हे प्रकट करतात की, येशू, मसिहा हाच देव आहे.

भाषांतर सूचना

  • जेंव्हा येशूने "मनुष्याचा पुत्र" या शब्दाचा उपयोग केला, तेंव्हा ह्याचे भाषांतर "असा एक जो मनुष्य झाला" किंवा "स्वर्गातून येणारा मनुष्य" असे केले जाऊ शकते.
  • काही भाषांतरकार कधीकधी "मी" किंवा "मला" या शीर्षकांचा समावेश करतात (जसे की, "मी, मनुष्यच पुत्र" यामध्ये), हे स्पष्ट करण्यासाठी की, येशू स्वतःबद्दल बोलत आहे.
  • या शब्दाचे भाषांतर चुकीचा अर्थ देत नाही हे खात्री करण्यासाठी तपासून पहा (जसे की एक युक्तिवादाला सोडून असलेला मुलगा, किंवा येशू केवळ मनुष्य होता असा चुकीचा चाप देणारा शब्द).
  • "मानवपुत्र" हा शब्द जेंव्हा एखाद्या मनुष्याला संदर्भित करण्यासाठी वापरला जातो, तेंव्हा त्याचे भाषांतर "तू, मानव" किंवा "तू, मनुष्य" किंवा "मानवी" किंवा "मनुष्य" असे केले जाते.

(हे सुद्धा पहा: स्वर्ग, पुत्र, देवाचा पुत्र, यहोवा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: