mr_tw/bible/kt/restore.md

3.6 KiB

पुनःस्थापन करणे (परत आणणे), परत आणेल, परत आणले, पुनःस्थापना

व्याख्या:

"परत आणणे" आणि "पुनःस्थापना करणे" या शब्दांचा अर्थ एखाद्या गोष्टीला त्याच्या मूळ आणि चांगल्या स्थितीला परत आणणे असा होतो.

  • जेंव्हा रोगग्रस्त झालेल्या एखाद्या अवयवाला परत आणले जाते, तेंव्हा त्याचा अर्थ तो भाग "बरा झाला" असा होतो.
  • एक तुटलेले नातेसंबंध, ज्याची पुनःस्थापना केली जाते, म्हणजे त्यांच्यात "समेट घडवून आणला जातो." देव पापमय लोकांची पुनःस्थापना करतो आणि त्यांना त्याच्याकडे परत आणतो.
  • जर लोकांचे पुनःस्थापन त्यांच्या देशात केले तर, त्यांना त्या देशामध्ये "परत आणले" जाते किंवा ते लोक त्या देशात "परततात."

भाषांतर सूचना:

  • संदर्भाच्या आधारावर, "पुनःस्थापना करणे" या शब्दाचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये "नवीकरण करणे" किंवा "परतफेड करणे" किंवा "बरे करणे" किंवा "परत आणणे" ह्यांचा समावेश होतो.
  • या शब्दासाठीच्या इतर अभिव्यक्ती, "नवीन बनवणे" किंवा "नवीन असल्यासारखे पुन्हा बनवणे" या असू शकतात.
  • जेंव्हा मालमत्तेची "पुनःस्थापना केली" जाते, तेंव्हा तिला "दुरुस्त केले जाते" किंवा "बदलले जाते" किंवा "त्याच्या मालकाला "परत दिले" जाते.
  • संदर्भाच्या आधारावर, "पुनःस्थापना करणे" याचे भाषांतर "नुतनीकरण करणे" किंवा "बरे करणे" किंवा "समेत घडवून आणणे" असे केले जाऊ शकते.

पवित्र शास्त्रातील संदर्भ: