mr_tw/bible/kt/predestine.md

2.6 KiB

पूर्वनियोजित, पूर्वी नेमलेले

व्याख्या:

"पूर्वनियोजित" आणि "पूर्वी नेमलेले" या शब्दांचा संदर्भ एखादी गोष्ट घडण्याच्या आधी निर्णय घेणे किंवा नियोजन करणे ह्याच्या समबंधात येतो.

  • या शब्दाचा विशेषकरून संदर्भ लोकांना सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून देव पूर्वनियोजन करतो, ह्याच्याशी येतो.
  • काहीवेळा "अगोदर नेमलेला" या शब्दाचा उपयोग केला जातो, ज्याचा अर्थ आधी निर्णय घेण्याशी येतो.

भाषांतर सूचना:

  • "पूर्वनियोजित" या शब्दाचे भाषांतर, "आधी ठरवणे" किंवा "वेळ यायच्या आधीच निर्णय घेणे" असे केले जाऊ शकते.
  • "पूर्वी नेमलेले" या शब्दाचे भाषांतर, "खूप आधीच ठरवलेले" किंवा "वेळ यायच्या आधीच योजना केलेले" किंवा "आधीच निर्णय घेतलेले" असे केले जाऊ शकते.
  • "आम्हाला पूर्वी नेमलेले होते" या वाक्यांशाचे भाषांतर "आम्हासाठी खूप आधी निर्णय घेतलेला होता" किंवा "आम्ही कोण असू ह्याचा निर्णय खूप आधी घेतलेला होता" असे केले जाऊ शकते.
  • या शब्दाचे भाषांतर, "पूर्वज्ञान" या शब्दाच्या भाषांतरापेक्षा वेगळे असायला हवे, ह्याची नोंद घ्या.

(हे सुद्धा पहा: पूर्वज्ञान)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: