mr_tw/bible/kt/name.md

4.8 KiB

नाव

व्याख्या:

“नाव” या शब्दाचा अर्थ असा आहे ज्याद्वारे एखाद्या विशिष्ट व्यक्तीला किंवा वस्तूस संबोधले जाते. पवित्र शास्त्रात, "नाव" हा शब्द वेगवेगळ्या संकल्पनांचा संदर्भ घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे वापरला जातो.

  • काही संदर्भांमध्ये, “नाव” एखाद्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेचा संदर्भ घेऊ शकतो, जसे की “चला आपण स्वत: साठी आपले नाव करु.”
  • “नाव” हा शब्द एखाद्या गोष्टीच्या आठवणीला संदर्भित असू शकते. उदाहरणार्थ, “मूर्तींची नाव काढून टाका” म्हणजे त्या मूर्ती नष्ट करणे म्हणजे यापुढे त्यांची आठवण होणार नाही किंवा त्यांची पूजा केली जाणार नाही.
  • “देवाच्या नावाने” बोलणे म्हणजे त्याच्या सामर्थ्याने व अधिकाराने बोलणे किंवा त्याचा प्रतिनिधी म्हणून बोलणे.
  • एखाद्याचे “नाव” संपूर्ण व्यक्तीला संदर्भित करु शकते, जसे “पृथ्वीवर दुसरे कोणतेही नाव नाही ज्याद्वारे आपले तारण होईल.” (पाहा: [रुपक]”

भाषांतरातील सुचना:

  • “त्याचे चांगले नाव” यासारख्या अभिव्यक्तीचे भाषांतर “त्याची चांगली प्रतिष्ठा” असे केले जाऊ शकते.
  • “नावाने” काहीतरी करणे याचे भाषांतर “च्या अधिकाराने” किंवा “परवानगीने” किंवा “त्या व्यक्तीचा प्रतिनिधी” असे केले जाऊ शकते.
  • “स्वतःचे नाव बनवा” या शब्दाचे भाषांतर “अनेक लोकांना आपल्याबद्दल माहीत करणे” किंवा “लोकांनी विचार करावा आम्ही खूप महत्वाचे असे करणे.”
  • “त्याचे नाव सांगा” या शब्दाचे "त्याला नाव द्या" किंवा "त्याला नाव देणे" असे भाषांतर केले जाऊ शकते.
  • “ज्यांना तुझे नाव आवडते” या वाक्यांशाचे भाषांतर “जे तुझ्यावर प्रेम करतात” असे केले जाऊ शकते.
  • “मूर्तींची नाव काढून टाका” या शब्दाचा अनुवाद “मूर्तिपुजक प्रतिमा काढून टाका जेणेकरून त्यांची आठवणही होणार नाही” किंवा “लोकांनी खोट्या देवतांची उपासना करणे थांबवतील” किंवा “सर्व मूर्ती नष्ट करा” म्हणजे यापुढे लोक त्यांच्याबद्दल विचार करणार नाही. ”

(हे देखील पाहा: [म्हणणे])

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

  • [1 योहान 02:12]
  • [2 तिमथ्याला पत्र 02:19]
  • [प्रेषितांचे कृत्ये 04:07]
  • [प्रेषितांचे कृत्ये 04:12]
  • [प्रेषितांचे कृत्ये 09:27]
  • [उत्पत्ती12:02]
  • [उत्पत्ती 35:10]
  • [मत्तय 18:05]

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: एच5344, एच7121, एच7761, एच8034, एच8036, जी2564, जी3686, जी3687, जी5122