mr_tw/bible/kt/mercy.md

6.0 KiB

दया, दयाळू

व्याख्या:

“दया” आणि “दयाळू” हे शब्द गरजू लोकांना मदत करणे, विशेषत: जेव्हा ते अत्यंत कठीन किंवा दीन परिस्थितीत असतात याला संदर्भित करते.

  • “दया” या शब्दामध्ये लोकांना चुकीच्या गोष्टी केल्याबद्दल शिक्षा न देणे याचा देखिल समावेश असु शकतो.
  • राजासारख्या सामर्थ्यवान व्यक्तीचे वर्णन “दयाळू” असे केले जाते जेव्हा तो लोकांचे नुकसान करण्याऐवजी दयाळूपणे वागतो.
  • दयाळू असणे म्हणजे ज्याने आपल्याविरुद्ध काहीतरी चूक केली आहे त्याला क्षमा करणे.
  • जेव्हा आम्ही जास्त गरजू लोकांना मदत करतो तेव्हा आम्ही दया दाखवतो.
  • देव आपल्यावर दया करतो आणि आपण इतरांवर दया केली पाहिजे अशी त्याची इच्छा आहे.

भाषांतरातील सूचना:

  • संदर्भानुसार “दया” या शब्दाचे भाषांतर “दयाळूपणा” किंवा “करुणा” किंवा “कळवळा” असे केले जाऊ शकते.
  • “दयाळू” या शब्दाचे भाषांतर “कळवळा दाखवणे” किंवा “दयाळू असणे” किंवा “क्षमा करणे” असे केले जाऊ शकते.
  • “दया दाखवा” किंवा “दया करा” हे भाषांतर “दयाळूपणे वागणे” किंवा “करुणामय होणे.” असे केले जाऊ शकते.

(हे देखील पाहा: [करुणा], [क्षमा करा])

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

  • [1 पेत्र 01:3-5]
  • [1 तिमथ्याला पत्र 01:13]
  • [दानिएल 09:17]
  • [निर्गम 34:06]
  • [उत्पत्ती 19:16]
  • [इब्री लोकांस पत्र 10:28-29]
  • [याकोबाचे पत्र 02:13]
  • [लूक 06:35-36]
  • [मत्तय 09:27]
  • [फिलिप्पैकरांस पत्र 02:25-27]
  • [स्तोत्रसंहीता 041:4-6]
  • [रोमकरांस पत्र 12:01]

पवित्र शास्त्राच्या कथांतील उदाहरणे:

  • [19:16] त्यांनी (संदेष्टे) सर्वांनी लोकांना सांगितले की मूर्तीची पूजा करणे थांबवा आणि इतरांचा न्याय करा आणि दया दाखवा.
  • [19:17] तो (यिर्मया) विहिरीच्या तळाशी असलेल्या चिखलात खाली बुडला, परंतु नंतर राजाने त्याच्यावर दया केले आणि आपल्या सेवकांना यिर्मयाला मरण्यापूर्वी विहिरीतून बाहेर काढायला सांगितले.
  • [20:12] पर्शियाचे साम्राज्य बळकट होते परंतु जिंकलेल्या लोकांसाठी ते दयामय होते.
  • __[27:11]__नंतर येशूने नियमशास्त्राच्या अधिकाऱ्याला विचारले, “तुला काय वाटते? लूटमार करुन मारहाण झालेल्या व्यक्तीचा त्या तिघांपैकी कोण शेजारी होता? ” त्याने उत्तर दिले, "ज्याने त्याच्यावर __दया__दाखवली."
  • [32:11] परंतु येशू त्याला म्हणाला, “नाही, तू घरी जावे आणि आपल्या मित्रांना आणि आपल्या कुटुंबियांना देवाने तुझ्यासाठी जे काही केले आहे त्याविषयी आणि त्याने तुझ्यावर कशी दया केली आहे हे सांगावे अशी माझी इच्छा आहे.”
  • [34:09] ““परंतु कर वसूल करणारा धार्मिक अधिकार्‍यापासून खूप दूर उभा राहिला, त्याने स्वर्गाकडेही पाहिले नाही. त्याऐवजी, त्याने छाती बडवली आणि प्रार्थना केली, '' देवा, माझ्यावर __दया__कर कारण मी एक पापी आहे.''

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: एच2551, एच2603, एच2604, एच2616, एच2617, एच2623, एच3722, एच3727, एच4627, एच4819, एच5503, एच5504, एच5505, एच5506, एच6014, एच7349, एच7355, एच7356, एच7359, जी1653, जी1655, जी1656, जी2433, जी2436, जी3628, जी3629, जी3741, जी4698