mr_tw/bible/kt/lordyahweh.md

4.6 KiB

प्रभु यहोवा, यहोवा देव

तथ्य:

जुन्या करारामध्ये, "प्रभु यहोवा" ह्याचा उपयोग एक खरा देव ह्याला संदर्भित करण्यासाठी वारंवार करण्यात आला आहे.

  • "प्रभु" हे पद एक दैवी शीर्षक आहे, आणि "यहोवा" हे देवाचे वैयक्तिक नाव आहे.
  • "यहोवा" हा शब्द"यहोवा देव" हा शब्द बनवण्यासाठी "देव" या शब्दाशी नेहमी जोडला जातो.

भाषांतर सूचना

  • जर "यहोवा" या शब्दाचा उपयोग देवाच्या वैयक्तिक नावाच्या भाषांतरासाठी केला जाऊ शकतो, तर "प्रभू यहोवा" आणि "यहोवा देव" ह्याचे भाषांतर शब्दशः केले जाऊ जाऊ शकते. * इतर संदर्भामध्ये जेंव्हा देवाला संदर्भित केले जाते, तेंव्हा "प्रभु" या शब्दाचे भाषांतर कसे केले गेले आहे, हे देखील विचारात घ्या.
  • काही भाषा नावाच्या आधी शीर्षक लावतात, आणि त्याचे भाषांतर "प्रभु यहोवा" असे केले जाऊ शकते. प्रकल्पित भाषेमध्ये स्वाभाविक काय आहे ते विचारात घ्या: "प्रभु" हे शीर्षक "यहोवा" च्या आधी किंवा नंतर असायला हवे?
  • "यहोवा देव" ह्याला "देव, ज्याला यहोवा म्हणून संबोधतात" किंवा "देव, जो एकमेव जिवंत देव आहे" किंवा "मी आहे, जो देव आहे" म्हणून देखील संदर्भित केले जाऊ शकते.
  • जर "यहोवा" ह्याचे भाषांतर "प्रभु" किंवा "परमेश्वर" म्हणून भाषांतर करण्याची परंपरा पाळत असेल तर, "प्रभू यहोवा" ह्याचे भाषांतर "प्रभु देव" किंवा "देव, जो प्रभु आहे" असे केले जाऊ शकते. इतर संभाव्य भाषांतरे "स्वामी परमेश्वर" किंवा "देव जो परमेश्वर" अशी असू शकतात.
  • "प्रभु यहोवा" हा शब्द "प्रभु परमेश्वर" म्हणून प्रस्तुत केला जाऊ नये, कारण वाचक कदाचित या अक्षरांमधील आकाराच्या फरकाकडे लक्ष देणार नाहीत, जे पारंपारिकपणे या दोन शब्दांचा फरक दर्शविण्यासाठी वापरले गेले आहेत, आणि ते अतिशय विचित्र दिसेल.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: देव, प्रभु, परमेश्वर, यहोवा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: