mr_tw/bible/kt/justice.md

11 KiB

न्याय्य, न्याय, अन्यायकारक, अन्याय, न्यायी ठरवणे, औचित्य

व्याख्या:

“न्याय्य” आणि “न्याय” म्हणजे देवाच्या नियमांनुसार लोकांना योग्य वागणूक देणे. मानवाचे नियम जे इतरांबद्दल देवाचे योग्य वर्तन प्रतिबिंबित करतात ते देखील न्याय्य आहेत.

  • “न्यायी” असणे म्हणजे दुसर्‍यांशी चांगल्या आणि योग्य मार्गाने वागणे. देवाच्या नजरेत नैतिकदृष्ट्या योग्य ते करण्यास प्रामाणिकपणा आणि सात्विकता याला देखील सूचित करते.
  • “न्यायीपणाने” वागणे म्हणजे लोकांना देवाच्या नियमांनुसार जे बरोबर, चांगले, आणि देवाच्या नियमांनुसार योग्य आहे त्यानुसार वागणे.
  • “न्याय” मिळविणे म्हणजे कायद्यांतर्गत योग्य वागणूक मिळणे, एकतर कायद्याद्वारे संरक्षित होणे किंवा कायदा मोडल्याबद्दल शिक्षा भोगणे.
  • कधीकधी “न्याय्य” या शब्दाचा अर्थ “नीतिमान” किंवा “देवाचे नियम पाळणे” असा होतो.

“अन्यायकारक” आणि “अन्यायकारकपणे” या संज्ञा लोकांना अयोग्य आणि बर्‍याचदा हानिकारक वागणूक देणे याला संदर्भित करते.

  • “अन्याय” म्हणजे एखाद्या व्यक्ती पात्र नसताही त्याच्याशी काहीतरी वाईट करणे हे लोकांशी अन्यायकारक वागणूक दर्शवते.
  • अन्याय म्हणजे काही लोकांना वाईट तर काही जनांना चांगली वागणूक देणे.
  • जो अन्यायकारक रीतीने वागत आहे तो “पक्षपाती” किंवा “पूर्वग्रहद” आहे कारण तो लोकांना समान वागणूक देत नाही.

“न्याय्य” आणि “न्याय्यपणा” या संज्ञा एखाद्या दोषी व्यक्तीला नीतिमान ठरविण्याला संदर्भित करतात. फक्त देवच लोकांना खऱ्यारीतीने नीतिमान ठरवू शकतो.

  • जेव्हा देव लोकांना नीतिमान ठरवितो तेव्हा देव त्यांच्या पापांची क्षमा करतो आणि असे करतो की त्यांच्यात कोणतेही पाप नाही. आपल्या पापांपासून आपल्या वाचवण्यासाठी पश्चात्ताप करणाऱ्या आणि येशूवर विश्वास ठेवणाऱ्या पापींना तो नीतिमान ठरवितो.
  • “न्याय्य” म्हणजे एखाद्याच्या पापांची क्षमा करतो आणि त्या व्यक्तीला त्याच्या दृष्टीने नीतिमान ठरवितो तेव्हा देव काय करतो हे सूचित करते.

भाषांतरातील सूचना:

  • संदर्भानुसार, “न्याय्य” अनुवादित करण्याच्या इतर मार्गांमध्ये “नैतिकदृष्ट्या बरोबर” किंवा “योग्य” याचा समावेश होऊ शकते.

  • “न्याय” या शब्दाचे भाषांतर “योग्य वागणूक” किंवा “पात्र परिणाम” असे केले जाऊ शकते.

  • “न्यायीपणाने वागणे” हे “योग्यतेने वागवणे” किंवा “न्यायाने वागणे” असे भाषांतर केले जाऊ शकते.

  • काही संदर्भांमध्ये, “न्याय्य” या शब्दाचे भाषांतर “नीतिमान” किंवा “सरळ” असे केले जाऊ शकते.

  • संदर्भानुसार, “अन्यायकारक” चे भाषांतर “अयोग्य” किंवा “पक्षपाती” किंवा “अनीतीमान” असेही केले जाऊ शकते.

  • “अन्यायकारक” या शब्दाचे भाषांतर “अन्याय करणारा” किंवा “अन्याय करणारे लोक” किंवा “इतरांशी अयोग्यरीतीने वागणारे लोक” किंवा “अनीतीमान लोक” किंवा “देवाची आज्ञा मोडणारे लोक” असे केले जाऊ शकते.

  • “अन्यायकारक” या शब्दाचे भाषांतर “अयोग्यरीतीने” किंवा “चुकीने” किंवा “अयोग्यतेने” असे केले जाऊ शकते.

  • “अन्याय” अनुवादित करण्याच्या मार्गांमध्ये “चुकीची वागणूक” किंवा “अयोग्य वागणूक” किंवा “अयोग्यतेने वागणे” यांचा समावेश असू शकतो. (पाहा: [नाममात्र विशेषण]

  • “न्यायी ठरविणे” भाषांतरित करण्याच्या इतर मार्गांमध्ये “(एखाद्याला) नीतिमान घोषित करणे” किंवा “(एखाद्याला) नीतिमान ठरविणे” याचा समावेश असू शकतो.

  • “औचित्य” या शब्दाचे भाषांतर “नीतिमान ठरविणे” किंवा “नीतिमान होणे” किंवा “लोकांना धार्मिक बनविणे” असे केले जाऊ शकते.

  • “नीतिमान ठरल्यामुळे” या शब्दाचे भाषांतर “देवाने पुष्कळ लोकांना नीतिमान ठरविले” किंवा “ज्यामुळे देवाने लोकांना नीतिमान ठरविले.” असे भाषांतर केले जाऊ शकते.

  • “आमच्या औचित्यासाठी” या वाक्यांशाचे भाषांतर “आम्ही त्या क्रमाने असे केले जाऊ शकते

(हे देखील पाहा: [क्षमा करा], [दोष], [न्यायाधीश], [नीतिमान], [धार्मिक])

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

  • [उत्पत्ती44:16]
  • [1 इतिहास 18:14]
  • [यशया 04:3-4]
  • [यिर्मया 22:03]
  • [यहेज्केल 18:16-17]
  • [मीखा 03:8]
  • [मत्तय 05:43-45]
  • [मत्तय 11:19]
  • [मत्तय 23:23-24]
  • [लूक 18:03]
  • [लूक 18:08]
  • [लूक 18:13-14]
  • [लूक 21:20-22]
  • [लूक 23:41]
  • [प्रेषितांचे कृत्ये 13:38-39]
  • [प्रेषितांचे कृत्ये 28:04]
  • [रोमकरांस पत्र 04:1-3]
  • [गलतीकरांस पत्र 03:6-9]
  • [गलतीकरांस पत्र 03:11]
  • [गलतीकरांस पत्र 05:3-4]
  • [तीताला पत्र 03:6-7]
  • [इब्री लोकांस पत्र 06:10]
  • [याकोबाचे पत्र 02:24]
  • [प्रकटीकरण 15:3-4]

पवित्र शास्त्राच्या कथांतील उदाहरणे:

  • [17:09] दावीदाने बरेच वर्ष न्यायाने आणि विश्वासूपणाने राज्य केले आणि देवाने त्याला आशीर्वाद दिला.
  • [18:13] यातील काही राजे (यहुदामधील) चांगले लोक होते ज्यांनी न्यायाने शासन केले आणि देवाची उपासना केली.
  • [19:16] त्या (संदेष्टे) सर्वांनी लोकांना सांगितले की त्यांनी मूर्तींची पूजा करणे थांबवावे आणि इतरांना न्याय आणि दया दाखवावी.
  • [50:17] __ येशू शांतीने आणि __ न्यायाने आपल्या राज्यात शासन करील आणि तो आपल्या लोकांबरोबर सर्वदा राहील.

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: एच205, एच2555, एच3477, एच4941, एच5765, एच5766, एच5767, एच6662, एच6663, एच6664, एच6666, एच8003, एच8264, एच8636, जी91, जी93, जी94, जी1342, जी1344, जी1345, जी1346, जी1347, जी1738