mr_tw/bible/kt/hope.md

5.3 KiB

आशा, आशा केली

व्याख्या:

आशा ही काहीतरी घडावे यासाठीची उत्कंठ इच्छा आहे. आशा एकतर भविष्यातील घटनेसंबंधी निश्चितता किंवा अनिश्चितता दर्शविते.

पवित्र शास्त्रात “आशा” या शब्दाचा अर्थ “विश्वास” असा आहे, जसे “माझी आशा प्रभूमध्ये आहे.” हे देवाने आपल्या लोकांना जे काही वचन दिले आहे ते प्राप्त होण्याच्या निश्चित अपेक्षेला संदर्भित करते.

  • कधीकधी यूएलटी या संज्ञेला मूळ भाषेतील शब्द “आत्मविश्वास” असे भाषांतरीत करते. हे मुख्यतः: नवीन करारामध्ये अशा परिस्थितीत घडते जिथे येशूवर आपला तारणहार म्हणून विश्वास ठेवणार्‍या लोकांना देवाने वचन दिले आहे ते प्राप्त करण्याचे आश्वासन (किंवा आत्मविश्वास किंवा आशा) असते.
  • “आशा नसणे” म्हणजे काहीतरी चांगले घडण्याची अपेक्षा नसणे होय. याचा अर्थ असा आहे की प्रत्यक्षात हे निश्चित आहे की ते होणार नाही.

भाषांतर सूचना:

  • काही संदर्भांमध्ये “आशा” या शब्दाचे भाषांतर “इच्छा” किंवा “अभिलाषा” किंवा “अपेक्षा” असेही केले जाऊ शकते.
  • “आशेसाठी काहीच नाही” या शब्दाचे भाषांतर “विश्वास ठेवण्यासारखे काहीही नाही” किंवा “चांगल्या कशाचीही अपेक्षा नसणे” असे केले जाऊ शकते.
  • “आशा नसणे” याचे भाषांतर “चांगल्या गोष्टीची अपेक्षा नसणे” किंवा “काहीच सुरक्षितता नसणे” किंवा “काही चांगले होणार नाही याची खात्री असणे” असे केले जाऊ शकते.
  • “तू आशा ठेवली आहे” या अभिव्यक्तीचे भाषांतर “आपली आशा ठेवली” किंवा “त्यामध्ये विश्वास ठेवला आहे” असेही केले जाऊ शकते.
  • “मला तुझ्या वचनाची आशा वाटते” या वाक्यांशाचे भाषांतर “मला खात्री आहे की तुझे वचन सत्य आहे” किंवा “तुझे वचन मला तुझ्यावर विश्वास ठेवण्यास मदत करतो” किंवा “जेव्हा मी तुझ्या वचनाचे पालन करतो तेव्हा मला आशीर्वाद मिळेल” असे देखील केले जाऊ शकते.
  • देवावर “आशा” यासारख्या वाक्यांशाचे भाषांतरही “, देवावर विश्वास ठेवा” किंवा “देव आपल्या वचनानुसार करील याची खात्री बाळगा” किंवा “देव विश्वासू आहे याविषयी निश्चित असा” असे केले जावू शकत.

(हे देखील पाहा: [आशीर्वाद], [आत्मविश्वास], [चांगले], [आज्ञा पाळणे], [विश्वास], [देवाचे वचन])

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

  • [1 इतिहास 29:14-15]
  • [1 थेस्सलनीकाकरांस पत्र 02:19]
  • [प्रेषितांचे कृत्ये 24:14-16]
  • [प्रेषितांचे कृत्ये 26:06]
  • [प्रेषितांचे कृत्ये 27:20]
  • [कलस्सैकरांस पत्र 01:05]
  • [ईयोब 11:20]

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: एच982, एच983, एच986, एच2620, एच2976, एच3175, एच3176, एच3689, एच4009, एच4268, एच4723, एच7663, एच7664, एच8431, एच8615, जी91, जी560, जी1679, जी1680, जी2070