mr_tw/bible/kt/brother.md

5.6 KiB

बंधू

व्याख्या:

“बंधू” या शब्दाचा अर्थ असा एक पुरुष भावंड जे कमीतकमी एका जैविक पालकाला सामायिक करतात.

  • जुन्या करारामध्ये, “बंधू” हा शब्द नातेवाईक किंवा सहकारी म्हणून सामान्य संदर्भ म्हणून वापरला जातो, जसे की त्याच जमाती, कुळ, व्यवसाय किंवा लोकसमूहाचे सदस्य. जेव्हा या प्रकारे वापरला जातो, तेव्हा हा शब्द पुरुष आणि स्त्रिया या दोघांनाही सूचित करतो.
  • नवीन करारामध्ये प्रेषित सहसा ख्रिस्ती पुरुष आणि स्त्रिया या दोघांनाही संदर्भित करण्यासाठी “बंधू” असा शब्द वापरतात.
  • नवीन करारात काही वेळा प्रेषितांनी “बहीण” असा शब्द वापरला होता विशेषत: स्त्री असलेल्या ख्रिस्ती सहकाऱ्याचा संदर्भत देत असताना, किंवा पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही यात समाविष्ट केले जात आहे यावर जोर देत असताना. उदाहरणार्थ, याकोब यावर भर देतात की जेव्हा तो “सर्व बंधू किंवा बहीण ज्यांना अन्नाची किंवा वस्त्रांची गरज आहे” असे संबोधतो तेव्हा तो सर्व विश्वासणाऱ्यांविषयी बोलत असतो.

भाषांतरातील सूचना:

  • या शब्दाचे भाषांतर नैसर्गिक किंवा जैविक भावाला संदर्भित करण्यासाठी लक्ष्य भाषेमध्ये वापरल्या जाणार्‍या शब्दशः शब्दाने करणे चांगले आहे, नाहीतर याचा अर्थ चुकीचा अर्थ होईल.
  • जुन्या करारात, विशेषत: जेव्हा “भाऊ” सामान्यपणे एकाच कुटुंबातील, कुळातील किंवा लोकसमूहाचे सदस्यं असल्याचा संदर्भ देण्यासाठी वापरले जाते, तेव्हा संभाव्य भाषांतरामध्ये “नातेवाईक” किंवा “कुळातील सदस्य” किंवा “सहकारी इस्राएल” याचा देखील समावेश असू शकतो.
  • ख्रिस्तामध्ये असलेल्या सहविश्वासणाऱ्याच्या संदर्भात, या संज्ञेचे भाषांतर “ख्रिस्तामधील बंधू” किंवा “आध्यात्मिक बंधू” असे केले जाऊ शकते.
  • जर पुरुष आणि स्त्रिया या दोघांचा उल्लेख केला जात असेल आणि “भाऊ” चुकीचा अर्थ देत असेल तर आणखी एक सामान्य नातेसंबंध वापरला जाऊ शकतो ज्यामध्ये पुरुष आणि स्त्री या दोघांचा समावेश असेल.
  • या संज्ञेचे भाषांतर करण्याचे इतर मार्ग जेणेकरून पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही संदर्भित करतात “सहविश्वासू” किंवा “ख्रिस्ती बंधू व भगिनी” हे असू शकेल.
  • केवळ पुरुषांचा उल्लेख केला जात आहे किंवा पुरुष आणि स्त्रिया दोघांचा समावेश आहे की नाही हे निर्धारित करण्यासाठी संदर्भ तपासण्याचे सुनिश्चित करा.

(हे देखिल पाहा: [प्रेषित], [देव जो पिता], [बहीण], [आत्मा])

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

  • [ प्रेषित07:26]
  • [उत्पत्ती 29:10]
  • [लेविय 19:17]
  • [नहेम्या 03:01]
  • [फिलिप्पै04:21]
  • [प्रकटी 01:09]

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: एच251, एच252, एच264, एच1730, एच2992, एच2993, एच2994, एच7453, जी80, जी81, जी2385, जी2455, जी2500, जी4613, जी5360, जी5569