एक खऱ्या देवाला सोडून ज्याची लोक उपासना करतात त्यांना खोटे देव म्हंटले जाते. * "देवी" ही संज्ञा विशेषकरून खोट्या स्त्री देवासाठी वापरली जाते.
* हे खोटे देव किंवा देवी अस्तित्वात नाहीत. यहोवा हाच एक परमेश्वर आहे.
* काहीवेळा लोक उपासना करण्यासाठी, त्यांच्या खोट्या देवाचे प्रतिक म्हणून वस्तूंची मूर्ती बनवतात.
* पवित्र शास्त्रामध्ये, देवाचे लोक वारंवार खोट्या देवांची उपासना करू नये या देवाच्या आज्ञेत राहण्यापासून मागे फिरले.
* खोटे देव आणि मूर्ती ज्यांची लोक उपासना करतात, त्यांना सामर्थ्य आहे ह्यावर विश्वास ठेवायला लावून सैतान सहसा लोकांना फसवतो.
* पवित्र शास्त्राच्या काळात, अनेक खोट्या देवतांपैकी बाल, दागोन, आणि मोलख या तीन खोट्या देवांची उपासना लोकांनी केली.
* अशेरा आणि अर्तमी या दोन देवींची पूर्वीच्या लोकांनी उपासना केली.
मूर्ती म्हणजे वस्तू जे लोक बनवतात, म्हणजे ते त्याची उपासना करू शकतात. काहीवेळा ह्याचे वर्णन "मूर्तिपूजक" असे केले आहे, जर तो एक खऱ्या देवाला सोडून इतर कशालातरी सन्मान देत असतो.
* ज्या खोट्या देवाची लोक उपासना करतात, त्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ते मूर्तींना बनवतात.
* हे खोटे देव अस्तित्वात नाहीत; याहोवा सोडून दुसरा कोणी देव नाही.
* काहीवेळा सैतान मूर्तींच्याद्वारे जरी त्याला सामर्थ्य नाही, तरी ते आहे, हे दाखवण्यासाठी कार्य करतो.
* मुर्त्या या नेहमी मौल्यवान साहित्यांनी, जसे की, सोने, चांदी, कांस्य, किंवा मौल्यवान लाकूड यांनी बनवल्या जातात.
* "मूर्तिपूजक साम्राज्य" म्हणजे "अशा लोकांचे राज्य जे मूर्तींची उपासना करतात" किंवा "अशा लोकांचे राज्य जे पृथ्वीवरील गोष्टींची उपासना करतात."
* "मूर्तिपूजक आकृती" ही संज्ञा "कोरलेल्या प्रतिमा" किंवा "मूर्ती" यासाठी दुसरा शब्द आहे.
* [रोमकरास पत्र 02:21-22](rc://*/tn/help/rom/02/21)
* [गलतीकरांस पत्र 04:8-9](rc://*/tn/help/gal/04/08)
* [गलतीकरांस पत्र 05:19-21](rc://*/tn/help/gal/05/19)
* [कलस्से. 03:5-8](rc://*/tn/help/col/03/05)
* [1 थेस्सलनीकाकरांस पत्र 01:8-10](rc://*/tn/help/1th/01/08)
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
* __[10:02](rc://*/tn/help/obs/10/02)__ या पीडांद्वारे देवाने दाखवून दिले की तो फारो आणि मिसरातील __देवतांपेक्षा__ अधिक सामर्थ्यशाली आहे.
* __[13:04](rc://*/tn/help/obs/13/04)__ मग देवाने त्यांना ही वचने सांगितली, "मी यहोवा, तुमचा देव आहे, ज्याने तुम्हास मिसरच्या दास्यत्वातून सोडवले. तुम्ही अन्य __देवतांची__ पूजा करू नका."
* __[14:02](rc://*/tn/help/obs/14/02)__ ते खोट्या __देवदवतांची__ पुजा करीत होते व पुष्कळ वाईट गोष्टी करीत होते.
* __[16:01](rc://*/tn/help/obs/16/01)__ इस्राएली लोक खरा देव, यहोवा ऐवजी कनानी __देवतांची__ उपासना करू लागले
* __[18:13](rc://*/tn/help/obs/18/13)__ परंतु यहूदाच्या राजांपैकी अनेक राजे दुष्ट होते. त्यांनी भ्रष्ट होऊन मूर्तिपूजा केली. त्यापैकी काही राजांनी तर स्वत:च्या मुलांचेही अर्पण खोटया __देवांसाठी__ केले.