पवित्र शास्त्राच्या काळात, एक वधस्तंभ हा एक सरळ लाकडी खांब जमिनीमध्ये अडकवलेला होता, ज्याबरोबर एक आडवी लाकडी तुळई त्याच्या टोकाला जोडलेली होती.
* रोमी सम्राटाच्या काळात, रोमी शासन गुन्हेगारांच्या शिक्षा अमलात आणण्यासाठी त्यांना वधस्तंभावर बांधून किंवा खिळून त्यांना मरण्यासाठी तेथे सोडून देत असत.
* जे अपराध येशूने केले नव्हते, त्या अपराधांमध्ये त्याला खोटेपणाने दोषी ठरवले आणि रोमी लोकांनी त्याला वधस्तंभावर खिळून मारले.
* हे लक्षात घ्या की, हे "पार करणे (CROSS)" या क्रियापदापासून पूर्णतः वेगळे आहे, ह्याचा अर्थ काश्यावरून तरी दुसऱ्या बाजूला पार जाणे, जसे की, नदी किंवा तळे.
* या शब्दाच्या भाषांतरासाठी, प्रकल्पित भाषेतील अशा शब्दाचा उपयोग करा ज्याचा संदर्भ वधस्तंभाच्या आकाराशी आहे.
* हे लक्षात घ्या की, जसे की, "फाशीचा खांब" किंवा "मृत्यूचे झाड" या वाक्यांशाचा उपयोग वधस्तंभाचे वर्णन करताना केला जातो, असे काहीतरी ज्यावर लोकांना ठार मारले जात होते.
* स्थानिक किंवा राष्ट्रीय भाषेतील पवित्र शास्त्राच्या भाषांतरांत या शब्दाचे भाषांतर कसे केले गेले आहे हे देखील विचारात घ्या. (पहाः [अज्ञात कसे भाषांतरित करायचे](rc://*/ta/man/translate/translate-unknown)
* __[40:01](rc://*/tn/help/php/02/05)__ सैनिकांनी येशूची थट्टा उडविल्यानंतर, ते त्यास वधस्तंभावर खिळे ठोकून मारण्यासाठी घेऊन गेले. ज्या वधस्तंभावर त्यास मारावयाचे होते तो __वधस्तंभ__ त्यांनी त्याच्या खांद्यावर दिला.
* __[40:02](rc://*/tn/help/obs/40/01)__ तेंव्हा ‘‘कवटी’’ नाव असलेल्या ठिकाणी ते त्याला घेऊन आले आणि त्यांनी येशूच्या हाता व पाया __क्रुसावर__ खिळले.
* __[40:05](rc://*/tn/help/obs/40/02)__ यहूदी पुढारी व जमावातील इतर लोकांनीही येशूची थट्टा केली. ते त्यास म्हणाले, ‘‘जर तू देवाचा पुत्र आहेस तर __वधस्तंभावरुन__ खाली उतरुन ये व स्वत:चा बचाव कर! म्हणजे आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवू.’’
* __[49:10](rc://*/tn/help/obs/40/05)__ जेंव्हा येशू __वधस्तंभावर__ मरण पावला, तेंव्हा त्याने तुमची शिक्षा स्वतःवर घेतली.
* __[49:12](rc://*/tn/help/obs/49/10)__ तुम्ही असा विश्वास धरिला पाहिजे की येशू हा देवाचा पुत्र आहे, तो माझ्यासाठी __वधस्तंभावर__ मरण पावला, व देवाने त्यास पुन्हा जिवंत केले आहे.