mr_tw/bible/kt/birthright.md

26 lines
2.9 KiB
Markdown
Raw Normal View History

# जेष्ठत्व, (जेष्ठ्पणा)
2018-08-14 03:00:16 +00:00
## व्याख्या:
2018-08-14 03:00:16 +00:00
पवित्र शास्त्रामध्ये, "जेष्ठत्व" या शब्दाचा संदर्भ सन्मान, कुटुंबाचे नाव, आणि भौतिक संपत्तीशी येतो, जे सामान्यपणे कुटुंबामध्ये प्रथम जन्मणाऱ्या मुलाला दिले जाते.
* प्रथम जन्मलेल्या मुलाच्या जेष्ठत्वामध्ये पित्याच्या वारसाचा दुप्पट हिस्स्याचा समावेश होता.
* राजाच्या प्रथम जन्मलेल्या मुलाला, सामान्यपणे राजा मेल्यानंतर तो जेष्ठ असल्यामुळे त्याला शासन करण्याचा अधिकार दिला जातो.
* एसावाने त्याचा जेष्ठत्वाचा हक्क त्याचा छोटा भाऊ याकोब ह्याला विकला. या कारणामुळे, याकोबाला एसावाच्या जागी, प्रथम जन्मणाऱ्या मुलाचे वारसाहक्काचे आशीर्वाद मिळाले.
* जेष्ठात्वामध्ये, कुटुंबाची वंशावली ही प्रथम जन्मलेल्या मुलाच्या रेशेद्वारे तपासली जाण्याचा सन्मानाचा समावेश होतो.
## भाषांतर सूचना:
2018-08-14 03:00:16 +00:00
* "जेष्ठत्व" या शब्दाचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये, "प्रथम जन्मलेल्या मुलाची संपत्ती आणि अधिकार" किंवा "कुटुंबाचा सन्मान" किंवा "प्रथम जन्मलेल्या मुलाचा विशेषाधिकार आणि वारसा" ह्यांचा समावेश होऊ शकतो.
(हे सुद्धा पहा: [प्रथम जन्मलेले](../other/firstborn.md), [वारस](../kt/inherit.md), [वंशज](../other/descendant.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
2018-08-14 03:00:16 +00:00
* [1 इतिहास 05:1-3](rc://*/tn/help/1ch/05/01)
* [उत्पत्ति 25:31-34](rc://*/tn/help/gen/25/31)
* [उत्पत्ति 43:32-34](rc://*/tn/help/gen/43/32)
* [इब्री लोकांस पत्र 12:14-17](rc://*/tn/help/heb/12/14)
2019-07-02 14:52:13 +00:00
2018-08-14 03:00:16 +00:00
* Strong's: H1062, G4415