mr_tw/bible/kt/anoint.md

35 lines
5.2 KiB
Markdown
Raw Normal View History

# अभिषेक, अभिषिक्त, अभिषेकाचे
2018-08-14 03:00:16 +00:00
## व्याख्या:
2018-08-14 03:00:16 +00:00
संज्ञा "अभिषेक" म्हणजे एखाद्या व्यक्तीवर किंवा वस्तूवर तेल ओतणे किंवा घासणे. कधीकधी तेलाला एक गोड, सुगंधी, वास देण्यासाठी त्याला मसाल्याच्या मिश्रणात मिसळले जायचे. ही संज्ञा लक्षनिक अर्थाने पवित्र आत्मा निवडणे आणि कोणाचेही सक्षमीकरण करणे याच्या संदर्भासाठी वापरतात.
* जुना करारानुसार, याजक, राजे आणि संदेष्ट्यांना देवाच्या खास सेवेसाठी वेगळे करण्याकरिता तेलाने अभिषेक करण्यात येई.
* वेद्या किंवा निवासमंडप यासारख्या वस्तूदेखील तेलाने अभिषेक करण्यात आल्या आहेत हे दर्शविण्यासाठी की ते देवाची उपासना व त्याचे गौरव करण्यासाठी वापरले जायचे.
* नवीन करारात, आजारी लोकांना बरे करण्यासाठी तेलाचा अभिषेक केला गेला.
* नवीन करारामध्ये नमूद केले आहे की येशूला स्त्री द्वारा त्याच्या उपासनेची कृती म्हणून दोन वेळा सुगंधित तेलाने अभिषिक्त करण्यात आले. एकदा येशू म्हणाला की हे करत असताना ती त्याच्या भावी अंत्यविधीची तयारी करत होती.
* येशूचा मृत्यू झाल्यावर त्याच्या मित्रांनी त्याचे शरीर तेल आणि मसाल्यांच्या अभिषेकाद्वारे दफन करण्यासाठी तयार केले.
* "मसिहा" (हिब्रू) आणि "ख्रिस्त" (ग्रीक) या शीर्षकाचा अर्थ "अभिषिक्त (एक)" असा होतो.
* येशू हाच मसिहा आहे जो संदेष्टा, महायाजक आणि राजा म्हणून निवडला आणि अभिषिक्त केला गेला.
## भाषांतर सूचना
2018-08-14 03:00:16 +00:00
* संदर्भाच्या आधारावर, "अभिषेक" या शब्दाचे भाषांतर "तेल ओतून" किंवा "तेल लावणे" किंवा "सुगंधी तेल ओतून समर्पित करणे" असे केले जाऊ शकते.
* "अभिषिक्त" होण्यासाठी या शब्दाचे भाषांतर "तेलाने अभिषेक करून समर्पित करणे" किंवा "नियुक्त करणे" किंवा "समर्पित करणे" असे केले जाऊ शकते.
* काही संदर्भांमध्ये "अभिषेक" हा शब्द "नियुक्ती" म्हणून भाषांतरित केला जाऊ शकतो.
* "अभिषिक्त याजक" या शब्दाचे भाषांतर "तेल ओतून समर्पित केलेला याजक" किंवा "तेल ओतून वेगळा केलेला याजक" असे केले जाऊ शकते.
(हे सुद्धा पहा: [ख्रिस्त](../kt/christ.md), [समर्पित](../kt/consecrate.md), [महायाजक](../kt/highpriest.md), [यहूद्यांचा राजा](../kt/kingofthejews.md), [याजक](../kt/priest.md), [संदेष्टा](../kt/prophet.md))
## पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
2018-08-14 03:00:16 +00:00
* [1 योहान 02:20-21](rc://*/tn/help/1jn/02/20)
* [1 योहान 02:27-29](rc://*/tn/help/1jn/02/27)
* [1 शमुवेल 16:2-3](rc://*/tn/help/1sa/16/02)
* [प्रेषितांची कृत्ये 04:27-28](rc://*/tn/help/act/04/27)
* [आमोस 06:5-6](rc://*/tn/help/amo/06/05)
* [निर्गम 29:5-7](rc://*/tn/help/exo/29/05)
* [याकोबाचे पत्र 05:13-15](rc://*/tn/help/jas/05/13)
2019-07-02 14:52:13 +00:00
2018-08-14 03:00:16 +00:00
* Strong's: H47, H430, H1101, H1878, H3323, H4397, H4398, H4473, H4886, H4888, H4899, H5480, H8136, G32, G218, G743, G1472, G2025, G3462, G5545, G5548