mr_tw/bible/kt/angel.md

50 lines
8.4 KiB
Markdown
Raw Normal View History

# देवदूत, आद्यदेवदूत
2018-08-14 03:00:16 +00:00
## व्याख्या:
2018-08-14 03:00:16 +00:00
परमेश्वराने निर्माण केलेला देवदूत एक शक्तिशाली आत्मा आहे. देवदूतांना परमेश्वर जे काही करायला सांगेल, ते करून देवाची सेवा करण्यासाठी ते अस्तित्वात आहेत. "आद्यदेवदूत" या शब्दाचा संदर्भ इतर देवदूतांवर अधिकार असलेला किंवा इतर सर्व देवदूतांचे नेतृत्व करणारा असा आहे.
* शब्द "देवदूत" याचा शब्दशः अर्थ "संदेशवाहक" असा होतो.
* "आद्यदूत" या शब्दाचा शब्दशः अर्थ "मुख्य संदेशवाहक" असा होतो. पवित्र शास्त्रामध्ये "आद्यदेवदूत" म्हणून संदर्भित केलेला एकमेव देवदूत मिखाएल आहे.
* पवित्र शास्त्रामध्ये, देवदूतांनी देवाकडून घेऊन लोकांना संदेश दिले आहेत. या संदेशांमध्ये लोकांच्याबद्दल देवाची काय इच्छा आहे, याविषयी सूचना समाविष्ट होत्या.
* देवदूतांनी भविष्यात होणाऱ्या घटनांविषयी किंवा आधीच घडलेल्या घटनांविषयी लोकांना सांगितले.
* देवदूतांना परमेश्वराचे प्रतिनिधी म्हणून त्याचे अधिकार आहेत आणि काहीवेळा पवित्र शास्त्रामध्ये ते असे बोलत होते जसे की देव स्वत: बोलत होता.
* देवदूतांनी परमेश्वराची सेवा लोकांना संरक्षण देऊन आणि बळकट करून सुद्धा केली आहे.
* एक विशेष वाक्यांश, "यहोवाचा दूत" याचा एकापेक्षा अधिक संभाव्य अर्थ आहे: 1) याचा अर्थ "देवदूत जो यहोवाचे प्रतिनिधित्व करतो" किंवा "दूत जो यहोवाची सेवा करतो" असा होऊ शकतो. 2) तो कदाचित स्वतःच देव असु शकतो, जो एका देवदूतासारखा दिसला जेंव्हा तो एखाद्या व्यक्तीशी बोलला. यापैकी एक अर्थ "मी" या शब्दाचा देवदूतांनी केलेला वापर स्पष्ट करतो, जसे की यहोवा स्वतः बोलत होता.
## भाषांतर सूचना
2018-08-14 03:00:16 +00:00
* "देवदूताचे" भाषांतर "परमेश्वराचा दूत" किंवा "देवाच्या आत्म्याने संदेशवाहन करणारा" किंवा "देवाचा स्वर्गीय सेवक" या मार्गाने सुद्धा होऊ शकते.
* "आद्यदेवदूत" या शब्दाचे भाषांतर "प्रमुख देवदूत" किंवा "मुख्याधिकारी देवदूत" किंवा "देवदूतांचा नेता" असे होऊ शकते.
* या संज्ञा राष्ट्रीय भाषा किंवा अन्य स्थानिक भाषेत कशा प्रकारे भाषांतरित केल्या जातात ते देखील विचारात घ्या.
* "यहोवाचा दूत" हा वाक्यांश "देवदूत" आणि "यहोवा" या शब्दांचा उपयोग करून भाषांतरित केला पाहिजे. हे त्या वाक्यांशाच्या विविध अर्थांबद्दल अनुमती देईल. संभाव्य भाषांतरांमध्ये "यहोवाकडून देवदूत" किंवा "यहोवाने पाठवलेले देवदूत" किंवा "यहोवा, जो एका देवदूतासारखा दिसला" ह्याचा समावेश होऊ शकतो.
(हे सुद्धा पहाः [अज्ञात कसे भाषांतरित करायचे](rc://*/ta/man/translate/translate-unknown)
2018-08-14 03:00:16 +00:00
(हे सुद्धा पहा: [प्रमुख](../other/chief.md), [प्रधान](../other/head.md), [दूत](../other/messenger.md), [मिखाएल](../names/michael.md), [शासक](../other/ruler.md), [सेवक](../other/servant.md))
## पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
* [2 शमुवेल 24:15-16](rc://*/tn/help/2sa/24/15)
* [प्रेषितांची कृत्ये 10:3-6](rc://*/tn/help/act/10/03)
* [प्रेषितांची कृत्ये 12:22-23](rc://*/tn/help/act/12/22)
* [कलस्सैकरांस पत्र 02:18-19](rc://*/tn/help/col/02/18)
* [उत्पत्ति 48:14-16](rc://*/tn/help/gen/48/14)
* [लुक 02:13-14](rc://*/tn/help/luk/02/13)
* [मार्क 08:38](rc://*/tn/help/mrk/08/38)
* [मत्तय 13:49-50](rc://*/tn/help/mat/13/49)
* [प्रकटीकरण 01:19-20](rc://*/tn/help/rev/01/19)
* [जखऱ्या 01:7-9](rc://*/tn/help/zec/01/07)
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
* __[02:12](rc://*/tn/help/obs/02/12)__ देवाने त्या बागेभोवती सामर्थ्यशाली __देवदूतांचा__ पहारा ठेवला, की कोणी त्या झाडाचे फळ खाऊ नये.
* __[22:03](rc://*/tn/help/obs/22/03)__ __देवदूत__ जख-यास म्हणाला,‘‘तुला ही सुवार्ता सांगण्यासाठी देवाने मला पाठविले आहे.
* __[23:06](rc://*/tn/help/obs/23/06)__ अचानक एक तेजस्वी __देवदूत__ येऊन त्यांच्यासमोर प्रकट झाला, आणि ते खूप घाबरले. __देवदूत__ म्हणाला, ‘‘भिऊ नका, कारण मी तुम्हास मोठ्या आनंदाची बातमी घेऊन आलो आहे.
* __[23:07](rc://*/tn/help/obs/23/07)__ अचानक, आकाशामध्ये __देवदूत__ देवाची स्तूती करत म्हणाले,‘‘वर स्वर्गात देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्या मनुष्यांवर त्याची कृपा झाली आहे त्यांस शांती!
* __[25:08](rc://*/tn/help/obs/25/08)__ मग __देवदूतांनी__ येऊन येशूची सेवा केली.
* __[38:12](rc://*/tn/help/obs/38/12)__ येशू खूप व्याकूळ झाला व त्याचा घाम रक्ताच्या थेंबासारखा झाला. देवाने एक __देवदूत __ पाठवून त्यास सामर्थ्य दिले.
* __[38:15](rc://*/tn/help/obs/38/15)__ मी पित्यास माझ्या बचावासाठी __देवदूतांचे__ सैन्य मागू शकतो.
2019-07-02 14:52:13 +00:00
2018-08-14 03:00:16 +00:00
* Strong's: H47, H430, H4397, H4398, H8136, G32, G743, G2465