mr_tn_old/rev/03/intro.md

4.9 KiB

प्रकटीकरण 03 सामान्य माहिती

संरचना आणि स्वरूप

अधिकार 2 आणि 3 यांना एकत्रितपणे सहसा “सात मंडळ्यांना सात पत्रे” असे म्हंटले जाते. तुमची इच्छा असेल तर तुम्ही प्रत्येक पत्र वेगळे करू शकता. नंतर वाचक त्या प्रत्येक पत्राला एक वेगळे पत्र म्हणून वाचू शकेल.

काही भाषांतरांनी पद्द्याची प्रत्येक ओळ ही उरलेल्या मजकुरापेक्षा अधिक उजवीकडे वाचण्यासाठी सुलभ व्हावी म्हणून ठेवलेली आहे. युएलटी ने हे 7व्या वचनाबरोबर केले आहे.

या अधिकारातील विशेष संकल्पना

देवाचे सात आत्मे

हे आत्मे प्रकटीकरण 1:4 चे सात आत्मे आहेत.

सात तारे

हे तारे प्रकटीकरण 1:20 चे सात तारे आहेत.

या अधिकारातील महत्वाचे रूपक

पहा, मी दाराजवळ उभा आहे आणि दार ठोठावीत आहे

येशू लावदिकीयाच्या ख्रिस्ती लोकांनी त्याची आज्ञा पाळण्यासाठी त्याची इछा बोलून दाखवत आहे की जसा तो एक मनुष्य आहे आणि लोकांनी त्याला घरात घेण्यासाठी आणि त्यांच्याबरोबर त्याने जेवण करण्यासाठी विचारात आहे (प्रकटीकरण 3:20). (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

”ज्याला कान आहेत तो जे आत्मा मंडळ्यास काय सांगतो ते ऐको” वक्त्याला हे पुरेपूर माहिती होते की, त्याच्या जवळजवळ सर्वच वाचकांना शारीरिक कान आहेत. येथे कान हे देव जे काही सांगतो ते ऐकून तसे करण्याची इछा करणे यासाठी एक रूपक आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

या अधिकारातील इतर शक्य अडचणी

“मंडळीचा दूत”

येथे “दूत” या शब्दाचा अर्थ “संदेशवाहक” असा सुद्धा होतो. हे कदाचित संदेशवाहकाला किंवा मंडळीच्या पुढाऱ्याला संदर्भित करत असेल. पहा तुम्ही “दूत” या शब्दाचे भाषांतर प्रकटीकरण 1:20 मध्ये कसे केले आहे.

“जो एक आहे त्याचे शब्द”

हे शब्द असणारे वचनांचे भाषांतर करणे अवघड आहे. ते एक संपूर्ण वाक्य तयार करत नाहीत.या वचनांच्या सुरवातीला तुम्हाला कदाचित “ही आहेत” अशा शब्दांची भर घालणे आवश्यक आहे. तसेच, येशूने या शब्दांचा उपयोग जसे की तो दुसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत होता असे स्वतःविषयी बोलण्यासाठी केला. तुमची भाषा कदाचित लोकांना जसे की ते दुसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत आहेत असे स्वतःबद्दल बोलण्याची परवानगी देत नसेल. येशूने बोलावयास सुरवात प्रकटीकरण 1:17 मध्ये केली. तो तिसऱ्या अधिकाराच्या शेवटपर्यंत बोलतच राहिला.