mr_tn_old/2jn/front/intro.md

5.3 KiB

2 योहानाचा परिचय

भाग 1: सामान्य परिचय

2 योहानाच्या पुस्तकाची रूपरेषा

  1. अभिवादन (1:1-3)
  2. प्रोत्साहन आणि महान आज्ञा (1:4-6)
  3. खोट्या शिक्षकांबद्दल चेतावणी (1:7-11)
  4. सहविश्वासणाऱ्यांकडून सलाम (1:12-13)

2 योहान हे पुस्तक कोणी लिहिले?

हे पत्र त्याच्या लेखकाचे नाव सांगत नाही. लेखक स्वतःची ओळख “वडील” म्हणून करून देतो. हे पत्र कदाचित प्रेषित योहानाकडून त्याच्या आयुष्याच्या शेवटी लिहिण्यात आले असावे. 2 योहानमधील मजकूर हा योहानकृत शुभवर्तमान या पुस्तकाच्या मजकुरासारखा आहे.

2 योहान हे पुस्तक कशाबद्दल आहे?

योहान या पत्रात तो “निवडलेली स्त्री” आणि “तिची मुले” या नावाने बोलावत असलेल्या कोण एकाला संबोधित करत आहे (1:1). हे कदाचित एखाद्या विशेष मैत्रिणीला आणि तिच्या मुलांना संदर्भित करत असेल. किंवा हे एखाद्या विश्वासणाऱ्यांच्या समूहाला किंवा सामान्यपणे विश्वासणाऱ्यांना संदर्भित करत असेल. हे पत्र लिहिण्यामागे योहानाचा हेतू त्याच्या श्रोत्यांना खोट्या शिक्षकांच्याबद्दल चेतावणी देणे हा होता. विश्वासणाऱ्यांनी खोट्या शिक्षकांना मदत किंवा पैसे देऊ नये असे योहानाला वाटत होते. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

या पुस्तकाच्या शीर्षकाचे भाषांतर कसे केले जाऊ शकते?

भाषांतरकार या पुस्तकाला त्याच्या “2 योहान” किंवा “दुसरे योहान” या पारंपारिक नावाने संबोधण्याची निवड करू शकतात. किंवा ते स्पष्ट शीर्षकाची निवड करू शकतात, जसे की “योहानापासूनचे दुसरे पत्र” किंवा “योहानाने लिहिलेले दुसरे पत्र.” (पहा: rc://*/ta/man/translate/translate-names)

भाग 2: महत्वाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक संकल्पना

आदरातिथ्य म्हणजे काय?

प्राचीनांमध्ये पश्चिमी भागाच्या जवळ आदरातिथ्य ही एक महत्वाची संकल्पना होती. परदेशी किंवा बाहेरच्या लोकांच्या बरोबर स्नेहपूर्ण रीतीने वागणे आणि गरज असल्यास त्यांना मदत करणे महत्वाचे होते. विश्वासणाऱ्यांनी पाहुण्यांचे आदरतिथ्य करावे अशी योहानाची इच्छा होती, तथापि त्यांनी खोट्या शिक्षकांचे आदरातिथ्य करू नये असे त्याला वाटत होते.

योहान ज्यांच्या विरुद्ध बोलला ते लोक कोण होते?

ज्या लोकांच्या विरुद्ध योहान बोलला ते कदाचित अज्ञातवासी म्हणून ओळखले गेले असावे. या लोकांनी विश्वास ठेवला की भौतिक जग दुष्ट आहे. म्हणून त्यांनी विश्वास ठेवला की येशू दैवी होता, त्यांनी तो खरोखर मनुष्य होता हे नाकारले. याचे कारण त्यांना असे वाटले की देव मनुष्य बनणार नाही, कारण भौतिक शरीर हे दुष्ट आहे. (पहा: rc://*/tw/dict/bible/kt/evil)