Door43-Catalog_mr_tn/PHM/01/01.md

3.8 KiB
Raw Blame History

हे पुस्तक म्हणजे एक पत्र आहे जे पौलाने फिलेमोन नामक माणसाला लिहिले.

ख्रिस्त येशूचा बंदिवान, पौल व आपला बंधू तीमथ्य ह्यांच्याकडून सहकारी फिलेमोन

एका पत्राच्या लेखकाची सुरुवात तुमच्या भाषेत असेल. ह्याचे भाषांतर ‘’आम्ही, पौल,येशुचा बंदिवान ,आणि तीमथ्य, आपला बंधू, ह्यांनी हे पत्र फिलेमोनाला लिहिले.

ख्रिस्त येशूचा बंदिवान

‘’जो येशू ख्रिस्ताविषयी शिक्षण दिल्यामुळे तुरुंगात आहे. ज्या लोकांना येशू आवडत नव्हता त्यांनी पौलाला तुरुंगात टाकून त्याला शिक्षा दिली.

आमचा प्रिय बंधू

‘’आपला प्रिय सहकारी’’ किंवा ‘’आमचा अध्यात्मिक बंधू ज्यावर आमचे प्रेम आहे’’

आणि प्रिय सहकारी

‘’जो, आपल्यासारखा, सुवार्तेच्या कार्यासाठी काम करत आहे’’

आमची बहिण आफ्फिया

ह्याचा अर्थ ‘’आफ्फिया, आपला सहकारी विश्वासणारी’’ किंवा ‘’आफ्फिया, आपली अध्यात्मिक बहिण’’ (पहा: नावांचे भाषांतर)

अर्खिप्प

हे एका पुरुषाचे नाव आहे.

आपला सहकारी शिपाई

येथे ‘’शिपाई’ एक रूपक अलंकार आहे ज्यात सुवार्तेचा प्रसार करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या व्यक्तीचे वर्णन केले आहे. ह्याचे भाषांतर ‘’आमचा सहकारी योध्दा’’ किंवा ‘’जो आपल्याबरोबर अध्यात्मिक युध्द लढतो. (पहा: रूपक अलंकार)

तुझ्या घरात जमनाऱ्या मंडळीला

‘’जो विश्वासनाऱ्याचा गट तुमच्या घरात भेटतो’’ (युडीबी)

तुझ्या घरात

‘’तुझ्या हा शब्द एकवचनी आहे आणि त्याचा संदर्भ फिलेमोनाशी आहे.

आपला पिता देव व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून तुम्हास कृपा व शांती असो

‘’आपला देव आणि प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला कृपा आणि शांती देवो. हा एक आशीर्वाद आहे. ‘’तू’’ हा शब्द अनेकवचनी आहे आणि त्याचा संदर्भ १ आणि २ वचनात सलाम केलेल्या सर्व लोकांशी सबंधीत आहे.