Door43-Catalog_mr_tn/1CO/11/05.md

1.5 KiB

तिच्या उघड्या मस्तकाने

डोक्यावर पदर न घेता, चेहरा न झांकता पदर जो डोक्यावरून खांद्याच्या खाली सोडलेला.

ती आपल्या मस्तकाचा अपमान करिते

संभाव्य अर्थ असे आहेत १) "ती स्वत:वर लांच्छन आणते" (UDB), किंवा २) "ती तिच्या पतीवर लांच्छन आणते."

जणू ती मुंडण केलेल्या स्त्रीसारखीच होते

जणू कांही तिने वस्तऱ्याने तिच्या डोक्यावरचे सर्व केस कापून टाकले आहेत.

स्त्रीसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे

आधुनिक काळाच्या विपरीत, स्त्रीने मुंडण करावे किंवा तिने केस छोटे कातरावे ही स्त्रीसाठी अपमानजनक किंवा मानखंडनाचे चिन्ह होते

तिने आपले मस्तक आच्छादावे

"तिने आपले मस्तक कापडाने झाकावे किंवा मस्तकावर पदर घ्यावा."