Door43-Catalog_mr_tn/1CO/10/14.md

2.0 KiB

मूर्तिपूजेपासून दूर पळा

"निर्णायकपणे मूर्तिपूजेपासून दूर राहा." (पाहा: रूपक)

आशीर्वादाचा प्याला

प्रभू भोजनाच्या विधीमध्ये उपयोगांत आणल्या जाणाऱ्या द्राक्षरसाच्या प्याल्याचे वर्णन करण्यासाठी पौल ह्या अभिव्यक्तीचा उपयोग करीत आहे.

तो ख्रिस्ताच्या रक्ताच्या सहभागितेचा प्याला आहे की नाही?

जो द्राक्षरसाचा प्याला आपण घेतो तो ख्रिस्ताच्या रक्ताच्या प्याल्याचे प्रतिनिधित्व करतो. AT: "आम्ही ख्रिस्ताच्या रक्तात सहभागिता करतो" (UDB; पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

जी भाकर आपण मोडतो ती ख्रिस्ताच्या शरीराच्या सहभागितेची भाकर आहे की नाही?

AT: "तेव्हा आपण भाकर खातो जेंव्हा आपण ख्रिस्ताच्या शरीरात सहभागिता करतो" (UDB; पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

भागीदार

"भाग घेणे" किंवा "इतरांबरोबर सामायिक रीतीने सहभागी होणे"

एक भाकर

भाजलेल्या पावाचा एक भाग, खाण्याअगोदर त्याचे तुकडे केले जातात.