Door43-Catalog_mr_tn/1CO/08/01.md

18 lines
2.4 KiB
Markdown

# आता
करिंथकरांनी पौलाला जो पुढील प्रश्न विचारला होता त्याची सुरूवात तो या वाक्यांशाने करीत आहे.
# मूर्तीला दाखविलेल्या नैवैद्द्यांविषयी
मूर्तिपूजक लोक नेहमी त्यांच्या दैवताला धान्य, मासे, पक्षी, आणि मांस यांचे अर्पण करीत असत. पुजारी त्यापैकी कांही भाग वेदीवर जाळून टाकीत असत. पौल येथे उरलेल्या भागाविषयी बोलत आहे, जो त्या मूर्तिपूजकाला दिला जात असे किंवा बाजारांत विकला जात असे.
# "आपल्या सर्वांना ज्ञान आहे" हे आपल्याला ठाऊक आहे
कांही करिंथकरांनी वापरलेल्या वाक्यांशाचा पौल येथे उल्लेख करीत आहे. AT: "आपल्या सर्वांना ठाऊक आहे, आणि तुम्हांला स्वत:ला हे सांगण्यांस आवडते की, 'आम्हां सर्वांना ज्ञान आहे.'"
# फुगविते
"एखाद्याला गर्विष्ठ करते" किंवा "एखाद्याला तो आवश्यकतेपेक्षा कोणतरी अधिक आहे असा विचार करण्यांस प्रवृत्त करणे"
# कांहीतरी माहीत आहे असे समजणे
"कोणत्याहि गोष्टीबद्दल सर्वकांही माहित आहे असा विश्वास करणारा"
# त्या व्यक्तीला त्याव्दारे ओळखले जाते
"देवा त्या व्यक्तीला ओळखतो" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)