Door43-Catalog_mr_tn/1CO/06/04.md

3.7 KiB

तर तुम्हांला दैनिक जिवनातील प्रकरणांचा न्यायनिवडा करावयाचा आहे

AT: "तुम्हांला जर दैनिक जिवनातील प्रकरणांचा न्यायनिवाडा करण्याचे पाचारण दिले आहे तर" किंवा "या जिवनातील महत्वपूर्ण प्रकरणांना तुम्ही मिटविलेच पाहिजे तर" (UDB).

तुम्ही अशी प्रकरणें का मांडता?

"तुम्ही अशी प्रकरणे सादर करू नयेत." (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

मंडळीमध्ये जे हिशेबांत नाहीत ते

करिंथकर ही प्रकरणे कशी हाताळीत आहेत याबद्दल पौल त्यांची खरडपट्टी काढीत आहे. संभाव्य अर्थ असे आहेत १) "ही प्रकरणे तुम्ही ज्यांना निर्णय घेता येत नाही मंडळीच्या अशा सदस्यांना सोपवू नका" किंवा २) "मंडळीच्या बाहेरील लोकांच्या हाती ही प्रकरणे सोपवू नका" किंवा ३) "इतर विश्वासणाऱ्याना पसंत नसलेल्या सदस्यांच्या हाती ही प्रकरणे तुम्ही देऊ शकता" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

तुम्हांला लाज वाटावी म्हणून

AT: "तुमचा अपमान करावा म्हणून" किंवा "तुम्ही या बाबतीत कसे अपयशी ठरला आहांत हे तुम्हांला दाखवावे म्हणून" (UDB)

ज्याला भावाबहिणीत निवाडा करत येईल असा एकहि शहाणा माणूस तुम्हांमध्ये नाही का?

AT: "या विश्वासणाऱ्यामधील वितंडवाद मिटविल असा तुम्हांला एक विश्वासणारा मिळू शकतो" (पाहा: अलंकायुक्त पश्न).

वाद

"वितंडवाद" किंवा "मतभिन्नता"

परंतु असे आहे

"ज्याप्रकारे आहे तसे" किंवा "परंतु त्याऐवजी" (UDB)

एक विश्वासणारा दुसऱ्या विश्वासणाऱ्या विरुद्ध कोर्टांत जातो आणि विश्वास न ठेवणाऱ्यापुढे त्याची फिर्याद करतो

AT: "विश्वासणारे एकमेकांमधील वितंडवादांना निर्णयासाठी अविश्वासणाऱ्या न्यायाधिशापुढे घेऊन जातात."

त्या प्रकरणांस पुढे ठेवतात

"एक विश्वासणारा ती फिर्याद सादर करतो" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)