Door43-Catalog_mr_tn/1CO/06/01.md

3.9 KiB

वाद

AT: "मतभेद" किंवा "वेगवेगळे मत"

दिवाणी न्यायालय

जेथे स्थानिक, आणि सरकारी न्यायाधीश प्रकरणांची तपासणी करून कोण बरोबर आहे हे ठरवितो.

तो आपले प्रकरण पवित्र जनांकडे न आणता दिवाणी न्यायालयात अनीतिमान न्यायाधिशापुढे नेण्याचे धाडस करीत आहे काय?

ख्रिस्ती लोकांनी त्यांचे वितंडवाद आपसांतच मिटवावेत असे पौल म्हणतो. AT: "तुमच्या सह

विश्वासणाऱ्या विरुद्ध तुमचे प्रकरण अनीतिमान न्यायाधीशांपुढे घेऊन येऊ नका. विश्वासणाऱ्या बंधूंनी त्यांचे वितंडवाद आपसांतच मिटविले पाहिजेत." (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

पवित्र जन जगाचा न्यायनिवाडा करितील हे तुम्हांस ठाऊक नाही काय?

जगाचा न्याय करण्याच्या भविष्याच्या पैलूचा पौल येथे उल्लेख करीत आहे. (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

तुमच्याकडून जगाचा न्यायनिवाडा व्हावयाचा आहे तर तुम्ही अगदी क्षुल्लक बाबींचा न्याय करण्यांस अपात्र आहां काय?

पौल असे म्हणतो की, भविष्यामध्ये संपूर्ण जगाचा न्याय करण्याची जबाबदारी आणि क्षमता त्यांना सोपविली जाईल, तर आता ते त्यांच्यामधील क्षुल्लक बाबींचा न्याय करण्यांस समर्थ असले पाहिजेत. AT: "भविष्यामध्ये तुम्ही जगाचा न्याय करणार आहांत, तर आता तुम्ही हे प्रकरण मिटवू शकता." (पाहा: अलंकारयुक्त पश्न)

प्रकरणे

"वाद" किंवा "मतभिन्नता"

आपण देवदूतांचा न्याय करणार आहो हे तुम्हांस ठाऊक आहे ना?

"आपण देवदूतांचा न्याय करणार आहोत हे तुम्हांस ठाऊक आहे." (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

आपण

पौल स्वत:चा व करिंथकरांचा समावेश करतो. (पाहा: समावेशीकरण)

तर मग या जीवनांतील बाबींचा आपण न्याय करू शकत नाही काय?

AT: "आपल्याला देवदूतांचा न्याय करण्याची जबाबदारी आणि क्षमता दिली जाईल म्हणून, या जिवनातील बाबींचा आपण नक्कीच न्याय करू शकू." (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न).