Door43-Catalog_mr_tn/1CO/03/12.md

2.4 KiB

या पायावर कोणी सोने, रुपें, मोलावन पाषाण, लाकूड, गवत, पेंढा यांनी बांधतो

नवीन इमारत बांधण्यासाठी लागणाऱ्या सामानाची तुलना जीवनभर व्यक्तीच्या वर्तन आणि उपक्रमास उभारण्यासाठी उपयोगांत येणाऱ्या आध्यात्मिक मूल्यांशी तुलना केली गेली आहे AT: "एखादा व्यक्ती इमारत बांधण्यासाठी महाग, टिकाऊ वस्तूंचा उपयोग करतो किंवा स्वस्त, ज्वलनशील वस्तूंचा उपयोग करतो." (पाहा: रूपक)

मोlल्यावान पाषाण

"महाग पाषाण"

त्याचे काम उघड होईल, तो दिवस ते उघडकीस आणील

जसा दिवसाचा उडेड बांधकऱ्याच्या कामाच्या प्रयत्नास उघडकीस आणतो, त्याप्रमाणेच देवाच्या उपस्थितीचा प्रकाश मनुष्याच्या प्रयत्नाच्या गुणवत्तेस आणि उपक्रमास उघड करील. AT: "दिवसाचा उजेड त्याच्या कामाच्या गुणवत्तेस दाखवील (पाहा: रूपक)

कारण तो अग्निसह प्रगट होईल आणि प्रत्येकाचे काम कसे आहे याची परीक्षा या अग्निनेच होईल

जशी अग्नीनेच इमारतीची मजबूती प्रगट होते किवा तिचा कमकुवतपणा नष्ट होतो, त्याप्रमाणे देवाचा अग्नी मनुष्याच्या प्रयत्नांचा आणि उपक्रमांचा न्याय करील." (पाहा: रूपक).