Door43-Catalog_mr_tn/1CO/03/10.md

2.0 KiB

माझ्यावर झालेल्या देवाच्या अनुग्रहाच्या

मानाने

"देवाने पूर्ण करण्यासाठी मला जे मुक्तपणे काम दिले होते त्यानुसार." (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी).

मी पाया घालता

पौल येशू ख्रिस्तावरील विश्वास आणि तारण या त्याच्या शिकवणीस इमारतीसाठी घातल्या जाणाऱ्या पायशी तुलना करीत आहे. (पहा: रूपक).

दुसरा त्याच्यावर इमारत बांधतो

आध्यात्मिकरित्या या विश्वासणाऱ्याचे साहाय्य करण्याव्दारे दुसरा कामकरी मंडळीमधील कार्याची "उभारणी" करतो. (पाहा: रूपक).

प्रत्येक मनुष्याने

हे सामान्यत: देवाच्या कार्यकर्त्यांचा उल्लेख करते. AT:"जो देवाची सेवा करतो त्या प्रत्येकाने."

घातलेल्या पायावाचून

एकदा इमारतीच्या पायावर इमारत बांधली गेली तर पाया बदलू शकत नाही. या बाबतीत, करिंथ येथील मंडळीचा पौलाने घातलेला पाया हा येशू ख्रिस्तच आहे. AT: मी, पौलाने घातलेल्या पायावाचून दुसरा पाया (पाहा:कर्तरी किंवा कर्मणी).