Door43-Catalog_mr_tn/1CO/03/08.md

19 lines
1.9 KiB
Markdown

# लावणारा व पाणी घालणारा हे एकच
आहेत
लावणारा व पाणी घालणारा ही कार्यें एकच गणली गेली आहेत ज्याची तुलना पौल आणि अपुल्लोस यांनी करिंथकरांच्या मंडळीची त्यांनी केलेल्या सेवेशी तुलना केली आहे.
# आपआपली मजुरी
कामकाऱ्याने किती चांगले काम केले आहे यानुसार त्याला दिल्या गेलेल्या पैशांची रक्कम.
# आम्ही
पौल आणि अपुल्लोस परंतु करिंथ मंडळी नव्हे. (पाहा: समावेशीकरण).
# देवाचे सहकारी
पौल स्वत:ला आणि अपुल्लोसला एकत्र मिळून काम करणारे देवाचे सहकारी समजतो.
# देवाचे शेत
शेताला भरपूर पीक येण्यासाठी लोक जशी त्याची काळजी घेतात त्याचप्रमाणे देव करिंथकरांच्या विश्वासणाऱ्याची काळजी घेतो. (पाहा: रूपक)
# देवाची इमारत
लोक जशी इमारत बांधतात त्याचप्रमाणे देवाने करिंथकरांच्या विश्वासणाऱ्याची रचना करून निर्मिती केली आहे (पाहा: रूपक)