Door43-Catalog_mr_tn/ROM/08/33.md

1.8 KiB
Raw Permalink Blame History

देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवेल? देवच नीतिमान ठरविणारा आहे

पौल भर देण्यासाठी प्रश्न वापरत आहे. पर्यायी भाषांतर: ‘’देवाच्या समोर आपल्याला कोणीही दोष लावू शकत नाही कारण तोच आपल्याला त्याच्या बरोबर योग्य असे प्रस्थापित करेल. (पहा: अभिप्रेत प्रश्न)

तर दंडाज्ञा करणारा कोण? तो ख्रिस्त येशू आहे का .....आणि जो आपल्यासाठी मध्यस्थी करतो?

पौल भर देण्यासाठी प्रश्न वापरत आहे. पर्यायी भाषांतर: ‘’आपल्याला कोणीही दोष लावू शकत नाही कारण तो येशू ख्रिस्त आहे..... आणि जो आपल्या वतीने देखील मध्यस्थी करतो.

तर तो मेलेल्यातून उठवला गेला

एका कर्तरी क्रियापदाने ह्याचे भाषांतर करता येते: ‘’ज्याला देवाने अगदी महत्वाने मेलेल्यातून उठवले’’ किंवा ‘’जो परत जिवंत झाला. (पहा: कर्तरी किंवा कर्मणी).