Door43-Catalog_mr_tn/ROM/08/20.md

3.5 KiB
Raw Permalink Blame History

कारण सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आली

एका कर्तरी क्रियापदाने पर्यायी भाषांतर: ‘’कारण देवाने जे काही निर्माण केले ते त्याच्या निर्मितीचा उद्देश मिळवण्यासाठी कार्यक्षम नव्हते. (पहा: कर्तरी किंवा कर्मणी)

ती आपखुशीने नव्हे, तर ती स्वाधीन केल्यामुळे

येथे ‘’निर्मिती’’ चे वर्णन जी व्यक्ती इच्छा बाळगू शकते तसे केले आहे. पर्यायी भाषांतर:’’निर्मित गोष्टींना हे हवे होते म्हणून नाही, तर देवाला हे हवे होते म्हणून. (पहा: मनुष्यात्वरोप)

सृष्टीही स्वतः नश्वर्तेच्या दास्यातून मुक्त होऊन

एक नवीन वाक्य आणि कर्तरी क्रियापदाच्या सहित पर्यायी भाषांतर:’’तरीही ज्या गोष्टी देवाने पूर्णपणे निर्माण केल्या आहेत ते देव त्यांचे तारण करेल ही निश्चितता बाळगू शकतात’’ (पहा युडीबी). भाषांतराच्या टिपा

दास्यातून कन्हण्यापर्यंत

निर्मितीमध्ये प्रत्येक गोष्टीची तुलना गुलाम आणि त्याच्या मालकाच्या गोष्टींचे कन्ह्णे अशी केली आहे. पर्यायी भाषांतर: ‘’सडणे आणि मृत पावणे ह्यापासून. (पहा: रूपक अलंकार)

देवाच्या मुलांची गौरवयुक्त मुक्तता मिळावी म्हणून

‘’आणि तो त्याच्या मुलांना सन्मान देईल तेव्हा त्यांची मुक्तता करेल’’

कारण आपल्याला ठाऊक आहे की सबंध सृष्टी आजपर्यंत कण्हत आहे व वदेना भोगत आहे

निर्मितीची तुलना ह्या ठिकाणी एक स्त्री प्रसूती वेदना सहन करून बाळाला जन्म देताना वेदना सहन करते त्याच्याशी होते, ‘’कारण आपल्याला ठाऊक आहे की देवाने जे काही निर्माण केले त्याला मुक्त असावे आणि स्त्रीने कण्हत जन्म देण्यासारखे राहण्याची इच्छा आहे.