Door43-Catalog_mr_tn/ROM/08/09.md

3.2 KiB
Raw Permalink Blame History

देहाच्या अधीन नाही, तर आत्म्याच्या अधीन आहा

८:५ मध्ये कसे ह्या वाक्यांशाचे भाषांतर केले ते पाहा.

आत्मा.. देवाचा आत्मा...ख्रिस्ताचा आत्मा

हे सर्व पवित्र आत्म्याचा संदर्भ देतात.

हे जर खरे असेल तर

ह्या वाक्यांशाचा अर्थ असा नाही की पौलाच्या मनात शंका नाही की त्यातील काही लोकांमध्ये देवाचा आत्मा आहे. पौलाला ह्याची जाणीव करून घ्यायची होती की त्या सर्वांमध्ये देवाचा आत्मा होता. पर्यायी भाषांतर: ‘’कारण’’ किंवा ‘’ह्यासाठी.

जर ख्रिस्त तुम्हामध्ये वस्ती करतो

ख्रिस्त एखाद्या व्यक्तीमध्ये कसा राहतो हे उघड करता येते: ‘’जर ख्रिस्त तुमच्यामध्ये पवित्र आत्म्याच्या द्वारे वस्ती करतो. (पहा: उघड आणि पूर्ण)

तर शरीर जरी पापामुळे मेलेले आहे, तरी दुसरीकडे

‘’एकीकडे’’ आणि ‘’दुसरीकडे’’ हे वाक्यांश कशावर तरी विचार करण्याच्या दोन पद्धती व्यक्त करतात. पर्यायी भाषांतर: ‘’पापाच्या संबंधी शरीर मृत आहे, पण. (पहा: शब्दप्रयोग)

पापाच्या संबंधी शरीर मृत आहे

शक्य अर्थ म्हणजे १) एखादी व्यक्ती अध्यात्मिक रीतीने पापाच्या दास्याला मृत आहे किंवा २) दैहिक शरीर अजूनही पापामुळे मरेल.

तरी आत्मा नितीमत्वामुळे जिवंत आहे

शक्य अर्थ म्हणजे १) जर एखाद्या व्यक्तीला देवाने योग्य ते करण्याचा अधिकार दिला तर ती व्यक्ती अध्यात्मिक रीतीने जिवंत आहे किंवा २) एखादी व्यक्ती मेल्यावर देव तिला परत जिवंत करेल कारण देव नीतिमान आहे आणि विश्वासणाऱ्यांना तो सार्वकालिक जीवन देतो.