Door43-Catalog_mr_tn/ROM/06/22.md

2.0 KiB
Raw Permalink Blame History

पण आता तुम्हाला पापापासून मुक्त केल्यावर तुम्ही देवाचे गुलाम झाल्यामुळे

एक पूर्ण वाक्य आणि कर्तरी क्रियापदांनी पर्यायी भाषांतर: ‘’पण आता तुम्हाला ख्रिस्ताने पापापासून मुक्त केले आणि देवाला जोडून दिले. (पहा: कर्तरी किंवा कर्मणी)

त्याचा शेवट तर सार्वकालिक जीवन आहे

‘’आणि ह्या सर्वांचा परिणाम म्हणजे तुम्ही सर्वकाळसाठी देवाच्या बरोबर राहणार.

कारण पापाचे वेतन मरण आहे

‘’वेतन’’ हा शब्द कोणालाही कामासाठी दिलेल्या पगाराचे दर्शक आहे. पर्यायी भाषांतर: ‘’कारण जर तुम्ही पापाची सेवा केली, तुम्हाला अध्यात्मिक मरण हे वेतन म्हणून मिळेल’’ किंवा ‘’जर तुम्ही पाप करत राहिलात, देव तुम्हाला अध्यात्मिक मरणाने शिक्षा देईल.

पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे

‘’जे आपला प्रभू ख्रिस्त येशूच्या मालकीचे आहेत त्यांना देव सार्वकालिक जीवन देतो’’