Door43-Catalog_mr_tn/ROM/06/04.md

2.9 KiB
Raw Permalink Blame History

तर मग आपण त्या मरणातील बाप्तीस्म्याने त्याच्याबरोबर पुरलो गेलो

पाण्यातील येशूच्या बाप्तीस्म्याची तुलना येशूचा मृत्यू आणि कबरेतील पुरणे जाणे ह्याच्याशी केली गेली आहे. ह्यामुळे भर द्नेयात येतो की ख्रिस्तातील विश्वासणारा त्याच्या मृत्यूत सहभागी होतो, ज्याचा अर्थ पापाचे विश्वासणाऱ्यांवर आता दास्य नाही. (पहा: रूपक अलंकार)

जसा ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठला त्याचप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे

एक विश्वसणारा जो जिवंत होतो त्याची तुलना येशू शारीरिक रीतीने जिवंत होण्याशी आहे. विश्वासणाऱ्यांचे नवीन अध्यात्मिक जीवन त्या व्यक्तीला देवाची आज्ञा पाळण्यास सहाय्य करते. पर्यायी भाषांतर, एका कर्तरी क्रियापदाने: ‘’जसे पित्याने मृत्यू झाल्यानंतर येशूला पुन्हा जिवंत केले, आपल्याला देखील नवीन अध्यात्मिक जीवन मिळून आपण देवाचे आज्ञापालन करू. (पहा: उपमा अलंकार आणि कर्तरी किंवा कर्मणी)

जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतीरुपाने त्यांच्याशी संयुक्त झालो आहो, तर त्याच्या उठण्याच्या प्रतीरुपाने त्याच्याशी संयुक्त होऊ

‘’त्याच्या मृत्यूत संयुक्त होण्याने....मरणानंतर जीवनाशी संयुक्त होऊन’’ किंवा ‘’त्याच्याबरोबर मरण सहन करून..... त्याच्याच बरोबर परत जिवंत झाले (पहा: रूपक अलंकार)