Door43-Catalog_mr_tn/ROM/05/14.md

2.4 KiB
Raw Permalink Blame History

तथापि

‘’तरीही’’ किंवा आदामापासून मोशेपर्यंत कोणताही शास्त्रलेख लिहण्यात आला नाही, पण’’ (पहा ५:१३)

आदामापासून मोशेपर्यंत मरणाने राज्य केले

पौलाने मरणाची तुलना राज्याशी केली आहे. (पहा: रूपक अलंकार). भाषांतर पर्यायी: ‘’आदामाच्या पासून मोशेपर्यंत लोकांच्या पापाच्या परिणामामुळे त्यांचा मृत्यू होऊ लागला.

ज्यांनी आदामाच्या उल्लंघनाच्या प्रकाराप्रमाणे पाप केले

‘’आदामाच्या पासून ज्या लोकांचे पाप वेगळे होते त्यांचा देखील मृत्यू होत राहिला’’

जो येणार होता त्याचे प्रतिरूप आहे

आदाम ख्रिस्ताचे एक प्रतिरूप होता, जो खूप नंतर व्यक्त झाला. त्याच्या बरोबर अनेक गोष्टी त्याच्या सामान्य होत्या.

कारण जर पुष्कळ माणसे मरण पावली, तर देवाची कृपा आणि व कृपादान विपुल झाले

‘’पुष्कळ मरण पावले’’ हे देखील तितकेच महत्वाचे आहे, पण ‘’देवाची कृपा आणि कृपादान’’ अधिक विपुल राहिले.

अधिक विपुलेतेने कृपा आणि कृपादान विपुल राहिले

‘’ती कृपा... आणि कृपादान’’ हे त्या ‘’अपराधाच्या’’ पेक्षा अधिक बलवान आणि श्रेष्ठ होते.