Door43-Catalog_mr_tn/ROM/03/05.md

2.3 KiB
Raw Permalink Blame History

पौल पुन्हा यहुदी व्यक्तीशी आपला वाद सुरु करतो, अशा प्रश्नांची उत्तरे देत जी त्या व्यक्तीला पडत असतात.

पण आपल्या अनितीमुळे जर देवाचे नितीमत्व स्थापित होते, तर आपण काय म्हणावे?

पौल हे शब्द काल्पनिक यहुदी व्यक्तीच्या मनात घालत आहे ज्याच्याशी तो बोलत आहे. पर्यायी भाषांतर: कारण आपली अनीती दाखवते की देव नीतिमान आहे, मला प्रश्न आहे:

देव जो क्रोधाने शासन करितो तो अनीतिमान आहे, असे म्हणावे की काय?

जर तुम्ही हे पर्यायी भाषांतर वापरले तर, ह्याचे उत्तर नाही ह्याची खात्री वाचक घेऊ शकतो: ‘’देव जो क्रोधाने शासन करतो, तो अनीतिमान आहे काय? (पहा: अभिप्रेत प्रश्न)

मी मानवी व्यवहाराने बोलत आहे

‘’एक अनीतिमान व्यक्ति बोलते तसेच मी हे बोलत आहे.

देव जगाचा न्याय कसा करेल?

ख्रिस्ती शुभवर्तमानाच्या विरुद्ध हे वाद विचित्र आहेत त्याचा वापर पौल करतो, कारण सर्व यहुदी लोक विश्वास ठेवतात की देव लोकांचा न्याय करू शकतो आणि करेल. ‘’आणि आपल्या सर्वांना हे माहित आहे की देव ह्या जगाचा न्याय करेल ! (पहा: अभिप्रेत प्रश्न)