Door43-Catalog_mr_tn/ROM/02/25.md

3.4 KiB
Raw Permalink Blame History

पौल एका काल्पनिक यहुदी व्यक्तीशी संवाद चालूच ठेवतो, ज्याला तो अभिप्रेत प्रश्नांनी दटावतो.

कारण सुंतेचा उपयोग आहे हे खरे

‘’मी हे सर्व म्हणतो कारण सुंता होणे तुम्हाला फायदेशीर होते’’

जर तुम्ही नियमशास्त्राचे उल्लंघन केले

‘’जर तुम्ही नियमशास्त्रातील आज्ञांचे पालन केले नाही तर’’

तुमची सुंता झालेली असूनही ती न झाल्यासारखीच आहे

जी व्यक्ती नियमशास्त्राचे पालन करत नाही त्याची तुलना शारीरिक रीतीने सुंता झालेल्या माणसासारखी आहे: तो यहुदी असू शकतो, पण एका परराष्ट्रीय व्यक्तीसारखा दिसतो.पर्यायी भाषांतर: ‘’असे दिसते की तुमची सुंता झालीच नाही. (पहा: रूपक अलंकार)

सुंता न झालेली व्यक्ती

‘’ज्या व्यक्तीची सुंता झालेली नाही’’

नियमशास्त्रातील नियम पाळले तर

‘’नियमशास्त्रात ज्याची आज्ञा दिली आहे त्याचे पालन केले तर’’

सुंता न होणे हे सुंता होणे असे गणण्यात येणार नाही काय? ज्याची निसर्गाने सुंता झालेली नाही तो तुमचा न्याय करणार नाही काय

पौल हा मुद्दा स्पष्ट करत आहे की सुंता होण्याने तुम्ही देवासमोर न्यायी आणि योग्य ठरत नाही. एका कर्तरी क्रियापदाने ह्याचे भाषांतर करता येते: देव त्याला सुंता झालेला असे लेखणार. ज्याची शारीरिक रीतीने सुंता झालेली नाही तो तुमचा न्याय करेल’’ (पहा: अभिप्रेत प्रश्न, कर्तरी किंवा कर्मणी)

जसा शास्त्रलेख असूनही व सुंता होऊनही जो तू नियमशास्त्रचे उल्लंघन करणारा आहेस

‘’ज्यांच्याकडे शास्त्रलेख आहे आणि सुंता होऊन ते नियमशास्त्राचे पालन करत नाही’’