Door43-Catalog_mr_tn/ROM/02/08.md

2.9 KiB
Raw Permalink Blame History

पौल एका काल्पनिक यहुदी व्यक्तीबरोबर संभाषण सुरु करतो.

स्वतःचा शोध करणारे

‘’स्वार्थी’’ किंवा ‘’जे त्यांना आनंदित करतात ह्याचा केवळ विचार करणे’’

क्रोध आणि कोप ही येतील

देवाच्या क्रोधावर भर देण्यासाठी एकच गोष्ट दोन पद्धतींनी बोलल्या आहेत. पर्यायी भाषांतर: ‘’देव त्याचा भयंकर क्रोध दाखवेल. (पहा: दुहेरी अर्थ)

आणि संकट व छळ

देवाची शिक्षा किती भयंकर असेल हे दोन वेगळ्या अर्थाने सांगण्यासाठी ह्या वेगळ्या पद्धती आहेत. एक नवीन वाक्य म्हणून ह्याचे भाषांतर करता येते: ‘’आणि भयंकर शिक्षा गुदरतील.

प्रत्येक मानवी जीवावर

येथे, पौल ‘’जीव’’ शब्द संपूर्ण व्यक्तीचा संदर्भ देण्यासाठी वापरत आहे. पर्यायी भाषांतर: ‘’प्रत्येक व्यक्तीवर. (पहा: उपलक्षण अलंकार)

ज्याने दुष्कृत्य केले

‘’ज्याने सातत्याने दुष्ट गोष्टी केल्या’’

प्रथम यहुदी, आणि मग हेल्लेणी

एक नवीन वाक्य म्हणून पर्यायी भाषांतर: ‘’देव यहुदी लोकांचा प्रथम न्याय करेल, आणि मग जे यहुदी लोक नाहीत त्यांचा करेल.

प्रथम

सुवार्ता ही पहिल्यांदा हेल्लेनी लोकांना गाजवली गेली नंतर ग्रीक लोकांना गाजवली, म्हणूनच येथे त्याचा प्राथमिक अर्थ १) वेळेच्या क्रमात प्रथम, त्याचा अर्थ हा देखील आहे २) ‘’अगदी निशिततेने’’ (पहा युडीबी) किंवा ‘’सगळ्यात महत्वाने.