Door43-Catalog_mr_tn/ROM/02/01.md

3.8 KiB
Raw Permalink Blame History

पौल एका काल्पनिक यहुदी व्यक्तीबरोबर संभाषण सुरु करतो.

तरी स्वतः तुला सबब नाही

तो शब्द ‘’तरी’’ एका गोष्टीतील नवीन सत्राची सुरुवात दर्शवतो. १:३१

३२ मध्ये जे बोलले गेले त्यावर आधारित सरते विधान तयार करते. पर्यायी भाषांतर: कारण जे सातत्याने पाप करतात त्यांना देव शिक्षा करेलच, तो निश्चितच तुमच्या पापांना काहीच सबब देणार नाही.

तू आहेस

येथे ‘’तू’’हा शब्द एकवचनी आहे. पौल एका खऱ्या व्यक्तीशी काही बोलत नाही. एक यहुदी व्यक्ती तिकडे आहे असे तो भासवतो आणि जान्हीकाही तो त्याच्याशी वाद घालत आहे. पौल त्याच्या श्रोत्यांना जणूकाही शिकवत आहे की जे कोणी पाप सतत करतील, त्यांना देव शिक्षा करेल, मग तो यहुदी अथवा परराष्ट्रीय असो. (पहा: परोक्ष संबोधन)

अरे मानवा, ज्यात तू दुसऱ्याचा न्याय करतोस

‘’मानवा’’ हा शब्द येथे कोणालातरी ओरडण्यास किंवा ज्याला वाटते की तो देवासारखे वागून इतरांचा न्याय करू शकेल ह्याची थट्टा करण्यास वापरला गेल आहे. एक नवीन वाक्य म्हणून त्याचे भाषांतर करता येते: ‘’तू तर केवळ एक माणूस आहेस, तरीही तू इतरांचा न्याय करतोस आणि म्हणतोस की ते देवाच्या शिक्षेस पात्र आहेत’’

कारण तू ज्यात इतरांचा न्याय करतोस त्यात तू स्वतःला दोष लावतोस

एक नवीन वाक्य म्हणून ह्याचे भाषांतर करता येते: ‘’पण तू तर स्वतःचा देखील न्याय करत आहेस कारण तू देखील असेच दुष्ट कृत्ये करतो जसे ते करतात.

पण आपल्याला ठाऊक आहे

ह्यात ख्रिस्ती विश्वासणारे आणि जे यहुदी ख्रिस्ती नाहीत अशा लोकांचा देखील समावेश आहे. (पहा: समविष्ट)

देवाचा न्याय सत्यानुसार आहे

‘’देव त्या लोकांचा न्याय सत्यतेने आणि रास्तपणे करेल’’ (पहा: मनुष्यात्वरोप)

जे अशाच गोष्टी करतात

‘’जे लोक अशी दुष्ट कृत्ये करतात’’