Door43-Catalog_mr_tn/PHP/02/09.md

2.3 KiB
Raw Permalink Blame History

प्रभू येशूची जी चित्तवृत्ती होती, तिचे वर्णन पौल करत राहतो

देवाने त्याला अति उच्च केले

‘’देवाने येशूला अगदी उंचावले आहे’’

सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले

येथे ‘’नाव’’ ह्याचा संदर्भ हुद्दा किंवा सन्मान ह्याच्याशी आहे. ह्याचे भाषांतर ‘’प्रत्येक हुद्द्यावर’’ किंवा ‘’सन्मानाच्या वर सन्मान. (पहा:अजहल्लक्षण अलंकार)

प्रत्येक गुडघा

येथे ‘’गुडघा’’ ह्याचा संदर्भ संपूर्ण व्यक्तिंशी आहे ह्याचे भाषांतर ‘’प्रत्येक व्यक्ती’’ किंवा ‘’प्रत्येकजण’’ असे देखील करता येते (पहा: उपलक्षण अलंकार)

पृथ्वीखाली

लोक मेल्यावर जिथे जातात त्याच्याशी ह्या जागेचा संदर्भ आहे, ज्याला सामान्य रीतीने ‘’अधोलोक’’ असे म्हंटले आहे, आणि ज्या ठिकाणी सैतान आणि भुते राहतात त्याला ‘’अगाधकुप’’ असे म्हंटले आहे.

प्रत्येक जिभेने

येथे ‘’जीभ’’ ह्याचा संदर्भ संपूर्ण व्यक्तीशी आहे. ह्याचे भाषांतर ‘’प्रत्येक व्यक्ती’’ किंवा ‘’प्रत्येकजण’’ ह्याच्याशी आहे. (पहा: उपलक्षण अलंकार)