Door43-Catalog_mr_tn/MAT/12/26.md

2.6 KiB

येशूने सैतानाच्या शक्तीने माणसाला बरे केले असे परुश्यांच्या आरोपाचा येशूने दिलेला प्रतिसाद पुढे चालू.

सैतान जर सैतानाला काढीत असेल तर = येथे दुसऱ्यादा वापरलेला सैतान हा शब्द दुष्टात्म्यांचा उल्लेख करतो. AT: "जर सैतान स्वत:च्या दुष्टात्म्यांच्या विरुद्ध कार्य करतो" (पाहा: सामीप्य मुलक लक्षणा)

सैतान......बालजबूल

दोन्ही नावे एकाच व्यक्तीचा उल्लेख करतात.

मग त्याचे राज्य कसे टिकणार?

परुश्याना आवाहन देण्यासाठी येशू प्रश्नाचा उपयोग करीत आहे. AT: "सैतानाचे राज्य टिकणार नाही" किंवा "सैतानाचे राज्य जास्त दिवस चालणार नाही" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

तुमचे अनुयायी त्यांन कोणाच्या साहाय्याने काढतात?

परुश्यांना आवाहान करण्यासाठी येशू दुसऱ्या प्रश्नाचा उपयोग करीत आहे. AT: "मग तुम्ही असे म्हणावयास पाहिजे की तुमचे अनुयायी देखील बालजबूलच्या साहाय्यानेच दुष्टात्म्यांना काढतात. परंतु, तुम्हांला हे माहित आहे की हे खरे नाही" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

आणि म्हणून तेच तुमचा न्याय करितील

"कारण तुमचे अनुयायी देवाच्या साहाय्याने भूतें काढत असल्यामुळे, माझ्याविषयी तुमचा अभिप्राय चुकीचा आहे असा ते पुरावा देतात."