Door43-Catalog_mr_tn/MAT/10/28.md

43 lines
4.6 KiB
Markdown

येशूने १०:१६ मध्ये त्याच्या शिष्यांना त्याच्यासाठी पुढे येणारा छळ सहन करावा लागेल हे सांगण्याचे सुरु केले होते ते तो चालू ठेवतो.
# जे शरीराचा घात करितात पण आत्म्याचा घात करावयास समर्थ नाहीत त्यांना भिऊ नका
"लोकांना भिऊ नका. ते शरीराचा घात करतात परंतु ते आत्म्याचा घात करू शकत नाहीत."
# शरीराचा घात करणे
शारीरिक मृत्यूस कारण होणे. हे जर शब्द बेढब आहेत तर त्यांचे असे भाषांतर होऊ शकते "तुम्हांला ठार मारतील" किंवा "दुसऱ्या लोकांना ठार मारतील"
# शरीर
व्यक्तीचा भाग ज्याला स्पर्श केला जाऊ शकतो.
# आत्म्याचा घात करणे
मेल्यानंतर लोकांना इजा करणे.
# आत्मा
व्यक्तीचा तो भाग ज्याला स्पर्श केला जाऊ शकत नाही शारीरिक मृत्युनंतर जो जगत राहातो.
# दोन चिमण्या दमडीला विकतात की नाही
ह्या अलंकारयुक्त प्रश्नांचे असे भाषांतर होऊ शकत "चिमण्यांचा विचार करा. त्यांचे मोल फार कमी आहे तुम्ही दोन चिमण्या एका दमडीला विकत घेऊ शकता" (यु डी बी ) (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)
# चिमण्या
लोक ज्या गोष्टीं महत्वाच्या समजत नाहीत त्यांच्यासाठी बियांचे दाणे खाणारे हे अतिशय लहान पक्षी ह्यांचा रूपक म्हणून उपयोग केला गेला आहे. (पाहा: रूपक)
# दमडी
लक्ष्य भाषेत ह्याचे नेहमी सर्वांत लहान नाणे म्हणून भाषांतर केले जाते. हे तांब्याच्या नाण्याचा उल्लेख करते जी एका मजुराला दिल्या जाणाऱ्या एका दिवसाच्या मजुरीचा सोळावा भाग आहे. ह्याचे असे देखील भाषांतर होऊ शकते "फार थोडे पैसे"
# तुमच्या पित्यावांचून त्यांतून एकहि भूमीवर पडणार नाही
ह्या अभिव्यक्तीचे असे भाषांतर होऊ शकते "त्यातून एकहि तुमच्या पित्याला जर माहित असेल तरच भूमीवर पडते" किंवा "केवळ तुमच्या पित्याला त्याबद्दल माहित असले तरच त्यातून एक भूमीवर पडते" (पाहा: पर्यायोक्ती)
# त्यातून एकहि
"एक चिमणी नाही"
# भूमीवर पडते
"मरते"
# तुमच्या डोक्यावरले सर्व केस देखील मोजलेले आहेत
"तुमच्या डोक्यावर किती केस आहते हे सुद्धा देवला माहित आहे" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)
# गणती केली आहे
"मोजलेले आहेत"
# पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे
"देव पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमची अधिक कदर करतो"