Door43-Catalog_mr_tn/MAT/10/24.md

4.8 KiB

येशूने १०:१६ मध्ये त्याच्या शिष्यांना त्याच्यासाठी पुढे येणारा छळ सहन करावा लागेल हे सांगण्याचे सुरु केले होते ते तो चालू ठेवतो.

गुरूपेक्षा शिष्य थोर नाही

हे कोणा विशिष्ट शिष्याचे किंवा गुरुचे विधान नसून एक सामान्य सत्याचे विधान आहे. एक शिष्य "त्याच्या गुरूपेक्षा अधिक महत्वाचा नाही." हे ह्यासाठी असू शकते की "त्याला अधिक माहिती नसते" किंवा "त्याचा उच्च दर्जा नसतो" किंवा गुरूपेक्षा "तो अधिक चांगला नाही" पर्यायी भाषांतर: "एक शिष्य नेहमी त्याच्या गुरूपेक्षा कमी महत्वाचा असतो" किंवा "एक गुरु त्याच्या शिष्यापेक्षा नेहमी अधिक महत्त्वाचा असतो."

धन्यापेक्षा दास थोर नाही

"आणि दास त्याच्या धण्यापेक्षा श्रेष्ठ नाही." हे कोणा विशिष्ट धन्याचे किंवा दासाचे विधान नसून एक सामान्य सत्याचे विधान आहे. एक दास त्याच्या धन्यापेक्षा "थोर" किंवा "अधिक महत्वाचा" नाही. पर्यायी भाषांतर: "एक दास नेहमी त्याच्या धन्यापेक्षा कमी महत्वाचा असतो" किंवा "एक धनी त्याच्या दासापेक्षा नेहमी अधिक महत्त्वाचा असतो."

दास

"गुलाम"

धनी

"मालक"

शिष्याने गुरुसारखे व्हावे इतके त्यांस पुरे

"एक शिष्य त्याच्या गुरूसारखा होतो ह्याचे त्याला समाधाना वाटावे."

त्याच्या गुरुसारखे व्हावे

"जितके त्याचा गुरु जाणतो तितकेच त्याने जाणावे" किंवा "त्याने त्याच्या गुरुसारखे असावे."

आणि दासाने त्याच्या धन्यासारखे असावे

"आणि त्याने त्याच्या धन्याइतकेच महत्वाचे असावे ह्यांत त्याने समाधान मानावे"

जर घरधन्यास बालजबूल म्हटले तर घराच्या माणसांना कितीतरी अधिक म्हणतील

येशूला वाईट वागणूक दिली गेली, तर येशूच्या शिष्यांनी तीच किंवा त्याच्यापेक्षा वाईट वागणूक त्यांना दिली जाईल ह्याची अपेक्षा करावी. (यु डी बी )

जर त्यांनी म्हटले

पर्यायी भाषांतर: "ज्याअर्थी लोकांनी म्हटले"

घरधनी

"घरधनी" म्हणून येशू स्वत:साठी ह्या रूपकाचा उपयोग करीत आहे. (पाहा: रूपक)

बालजबूल

मूळ भाषेतील शब्दाचे प्रत्यक्ष भाषांतर १) "बालजबूल" म्हणून भाषांतर केले जाऊ शकते किंवा २) त्याचा अभिप्रेत अर्थ "सैतान" म्हणून भाषांतर केले जाऊ शकते.

त्याच्या घरच्या माणसांना

येशू "त्याच्या घराच्या माणसांना" ह्या रूपकाचा त्याच्या शिष्यांसाठी उपयोग करीत आहे.