Door43-Catalog_mr_tn/MAT/10/16.md

5.0 KiB

येशू त्याच्या शिष्यांना त्याच्यासाठी त्यांना सहन कराव्या लागणाऱ्या भावी छळाबद्दल सांगण्यांस सुरुवात करीत आहे.

पाहा

"पाहा" शब्द मागून येणाऱ्या गोष्टींवर भर देत आहे. पर्यायी भाषांतर: "मी आता जे तुम्हांला सांगणार आहे त्याकडे लक्ष द्या" (पाहा यु डी बी )

मी तुम्हांला पाठवितो

येशू त्यांना एका विशिष्ट कारणासाठी पाठवीत आहे.

लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावे तसे

येशू त्याच्या ज्या शिष्यांना पाठवीत आहे त्यांची तुलना तो जेथे हिंसक प्राणी त्यांच्यावर हल्ला करू शकतील अशा ठिकाणी जाणाऱ्या व स्वत:चे संरक्षण करण्यांस असमर्थ अशा प्राण्यांशी करीत आहे. (पाहा: उपमा)

मेंढरांसारखे

स्वत;चे संरक्षण करण्यांस असमर्थ (पाहा: उपमा)

लांडग्यांमध्ये

तुम्ही उपमेस स्पष्ट करू शकता जसे "लांडग्यांसारख्या धोकादायक लोकामध्ये" किंवा "धोकादायक प्राणी जसे वागतात असे वागणाऱ्या लोकांमध्ये" किंवा सारखेपणाच्या गोष्टीस नमूद करा, "जे लोक तुमच्यावर हल्ला करतील अशा लोकांमध्ये" (पाहा: रूपक)

सापांसारखे चतुर आणि कबूतरांसारखे निरुपद्रवी व्हा

उपमेस येथे नमूद न केलेलं फार चांगले (पाहा: उपमा) "समजबुद्धीने आणि जपून, तसेच निरागसपणाने आणि चांगुलपणाने वागा." (पाहा: उपमा)

लोकांपासून जपून राहा, कारण ते तुम्हांला धरून देतील

"सावध राहा, कारण लोक तुम्हांला धरून देतील."

च्या पासून जपून राहा

"लक्ष असू द्या" किंवा "जपून राहा" किंवा "च्या बद्दल स्वत:ची काळजी घ्या" (पाहा: रूपक)

तुम्हांला धरून देतील

यहूदाने येशूला काय केले त्यासाठी हा शब्द आहे. (पाहा यु डी बी ) पर्यायी भाषांतर: "तुमचा विश्वासघात करतील" किंवा "तुम्हांला धरून देतील" किंवा "तुम्हांला अटक करून वेठीस धरले गेले होते काय."

न्यायसभा

येथे अर्थ स्थानिक धार्मिक पुढारी किंवा वडील जन जे दोघे मिळून समाजामध्ये शांती राखतात. पर्यायी भाषांतर: "न्यायालायें."

तुम्हांला फटके मारतील

"चाबकाने तुम्हांला फटके मारतील"

तुम्हांला आणण्यांत येईल

"ते तुम्हांला घेऊन येतील" किंवा "ते तुम्हांला खेचून आणतील" (पाहा: कर्तरि किंवा कर्मणी)

माझ्यामुळे

"कारण तुम्ही माझ्या मालकीचे आहांत" (यु डी बी ) "कारण तुम्ही माझे अनुसरण करता"

तुम्ही त्यांना आणि परराष्ट्रीयांना

"त्यांना" हे सर्वनाम "राज्यपालांचा आणि राजांचा" किंवा यहूदी आरोप्यांचा उल्लेख करतो (१०:१७).