Door43-Catalog_mr_tn/MAT/10/11.md

4.2 KiB

१०:१ मध्ये सुरु झालेला की येशू त्याच्या बारा प्रेषित त्याचे कार्य करण्यासाठी पाठवितो तो अहवाल पुढे चालू.

तुम्ही...तुम्हांला

ही सर्वनामे बारा प्रेषितांचा उल्लेख करतात.

ज्या कोणत्या नगरांत किंवा गावांत तुम्ही प्रवेश कराल

"जेव्हा जेव्हा तुम्ही नगरांत किंवा गावांत प्रवेश कराल" किंवा "प्रत्येक नगरांत किंवा गावांत तुम्ही जाल"

नगर...गाव

"मोठे गाव....लहान गांव" किंवा "मोठे नगर.....लहान नगर" ९:३५ मध्ये असलेले तेच शब्द येथे सुद्धा आहेत.

तेथून जाईपर्यंत तेथेच राहा

"ते नगर किंवा गाव सोडेपर्यंत त्याच व्यक्तीच्या घरांत राहा"

तुम्ही घरांत जातांना, अभिवादन करा

"तुम्ही घरांत जातांना घरांत राहाणाना अभिवादन करा." "ह्या घराला शांती असो" असे त्याकाळचे अभिवादन होते (पाहा: सामीप्यमुलक लक्षणा)

घर योग्य असले

"त्या घरांत राहाणाऱ्यानी जर तुमचे चांगले स्वागत केले" (यु डी बी ) किंवा "त्या घरांत राहाणाऱ्या

याऱ्य लोकांनी तुम्हांला चांगली वागणूक दिली तर" (पाहा: सामीप्यमुलक लक्षणा)

त्यांना तुमची शांती प्राप्त होवो

"त्यांच्यावर तुमची शांती येवो" किंवा "त्या घरांत राहाणारे लोक शांतीने राहो" (यु डी बी )

तुमची शांती

त्या घरातील लोकांना ती शांती प्राप्त व्हावी म्हणून प्रेषित देवाची प्रार्थना करणार.

ते योग्य नसले तर

"त्यांनी जर तुमचे चांगले स्वागत केले नाही तर" (यु डी बी ) किंवा "त्यांनी तुम्हांला चांगली वागणून दिली नाही तर"

तुमची शांती तुम्हांकडे परत येवो

ह्या दोघांपैकी एक अर्थ असू शकतो १) जर ते घर योग्य नसेल तर, देव त्या घरावर त्याची शांती किंवा आशीर्वाद रोखून धरील, जसे (यु डी बी ), मध्ये व्यक्त केले आहे किंवा २) जर ते घर योग्य नसले तर प्रेषित कांहीतरी करणार होते, जसे देवाने त्यांच्या अभिवादनाचा सन्मान करू नये हे ते देवाला विचारणार होते. जर तुमच्या भाषेमध्ये अभिवादन किंवा त्याचा परिणाम मागे घेण्याचा प्रबंध असेल तर येथे त्याचा उपयोग अवश्य करा.