Door43-Catalog_mr_tn/MAT/10/05.md

2.6 KiB

येशू त्याच्या बारा शिष्यांना त्याचे कार्य करण्यासाठी पाठवितो तो अहवाल पुढे चालू.

ह्या बारा जणांना येशूने पाठविले

:येशूने ह्या बारा पुरुषांना पाठविले" किंवा "हे ते बारा लोक होते ज्यांना येशूने पाठविले होते"

पाठविले

येशूने त्यांना एका खास विशेष कामासाठी पाठविले होते. "प्रेषित ह्या सर्वनामाचा तो शाब्दिक प्रकार आहे ज्याचा उपयोग १०:२ मध्ये केला गेला आहे.

त्याने त्यांना सूचना दिली

"त्यांनी काय करावयास पाहिजे होते हे त्याने त्यांना सागितले" ह्याचे ह्या प्रकारे भाषांतर होऊ शकत "त्याने त्यांना आज्ञा केली."

इस्राएलाच्या घराण्यांतील हरवलेली मेंढरे

हे रूपक आहे त्यांच्या मेंढपाळापासून दूर भटकलेल्या मेंढराशी इस्राएलाच्या संपूर्ण राष्ट्राची तुलना करणे (यु डी बी ). (पाहा: रूपक)

इस्राएलाचे घराणे

ही अभिव्यक्ति इस्राएल राष्ट्राच उल्लेख करते. ह्याचे असे भाषांतर केल जाऊ शकते "इस्राएलाचे लोक" किंवा "इस्राएलाचे वंशज." (पाहां: सामीप्यमुलक लक्षणा)

जात असतांना

सर्वनाम "तुम्ही" हे त्याच्या बारा प्रेषितांचा उल्लेख करतो.

स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे

३:२ मधील कल्पनेचे तुम्ही जसे भाषांतर केले आहे तसेच ह्याचे देखील करा.