Door43-Catalog_mr_tn/MAT/09/20.md

19 lines
2.2 KiB
Markdown

यहूदी अधिकाऱ्याच्या मुलीला बरे करण्यास जात असतांना येशू एका दुसऱ्या स्त्रीला कसे बरे करतो ह्याचे हे वर्णन आहे.
# पाहा
हा शब्द आपल्याला कथेतील नवीन लोकांविषयी सावध करतो. असे करण्यास तुमच्या भाषेमध्ये मार्ग असेल.
# तीव्र रक्तस्राव होत होता
"गंभीर रक्तस्राव होत होता" कदाचित तिच्या गर्भातून रक्तस्राव होत असावा, तरीहि त्यासाठी ती कांही सामान्य वेळ नव्हती. कांही संस्कृतीमध्ये ह्या अवस्थेचा उल्लेख करण्याचे विनयशील मार्ग आहेत. (पाहा: शिष्टोक्ति)
# मी केवळ त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले तरी बरी होईन
ते वस्त्र तिला बरे करील असा तिचा विश्वास नव्हता. येशू तिला बरे करील असा तिचा विश्वास होता. (पाहा: मानवीकरण)
# वस्त्र
"झगा"
# परंतु
"त्या ऐवजी." जे कांही होईल असे त्या स्त्रीला वाटत होते ते झाले नाही.
# मुली
ती सरी येशूची खरी मुलगी नव्हती. येशू तिच्याशी विनयशीलपणे बोलत होता. जर हे गोंधळात टाकणारे आहे. ह्याचे असे सुद्धा भाषांतर करू शकतो "हे तरुण स्त्री" किंवा वगळले जाऊ शकते.